OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 06:25 PM2019-05-03T18:25:18+5:302019-05-03T18:25:49+5:30
अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. ती पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे
छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. ती पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे आणि ते सोशल मीडियावरील पोस्ट व फोटोमुळे. मीराने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ज्यात ती आणि अभिनेता रोहन गुजर दिसतो आहे. या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर त्या दोघांच्या अफेयरविषयी चर्चा होते आहे. या फोटोच्या आधी सोशल मीडियावर मीराने एक बाबांसाठी पत्र लिहिले असून त्यातदेखील रोहनच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्या या चर्चेला आणखीन उधाण आले आहे.
मीरा जोशीनेरोहन गुजरसोबत इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून लिहिले, सनकिस्ड. Soon.
या पोस्टमध्ये मीरा जोशीने रोहनसोबत केलेला फोटो पाहून नक्की ते अफेयरमध्ये आहेत की ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार आहेत, असा प्रश्न पडतो.
या फोटोच्या आधी मीराने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असून ते तिेने तिच्या बाबांना पत्र लिहिले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, बाबा, माझे प्रत्येक स्वप्न तू पूर्ण करत आलास आणि मग स्वप्न बघण्याची सवयच लागली. रोहन माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी जातेय. प्लीझ समजून घे. तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही. लव यू. तुझे मोरपीस मीरा.
मीरा जोशीच्या या पत्रानंतर एकीकडे खरेच रोहन आणि मीरा अफेयरमध्ये तर नसतील ना असा प्रश्न पडतो. तर दुसरीकडे हा सगळा प्रोजेक्टचा भाग असण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे यामागचे खरे कारण जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.