"तुझ्या कानाखाली मारू का?", RK बद्दल 'तो' प्रश्न विचारताच करण जोहरला दीपिका असं का म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 12:55 PM2024-04-04T12:55:37+5:302024-04-04T12:56:09+5:30
रणबीर कपूरबरोबर असेलल्या रिलेशनशिपमुळे दीपिका चर्चेत आली होती. दीपिकाने रणबीरच्या नावाचा RK असा टॅटूही काढला होता. यावरुनच करण जोहरने तिला कॉफी विथ करणमध्ये प्रश्न विचारला होता.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला कोण ओळखत नाही? अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी दीपिका एक गुणी अभिनेत्री आहे. अनेक बॉलिवूड सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून दीपिकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बॉलिवूडमधील करिअरमध्ये दीपिकाच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. रणबीर कपूरबरोबर असेलल्या रिलेशनशिपमुळे दीपिका चर्चेत आली होती. दीपिकाने रणबीरच्या नावाचा RK असा टॅटूही काढला होता. यावरुनच करण जोहरने तिला कॉफी विथ करणमध्ये प्रश्न विचारला होता.
करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिकाने हजेरी लावली होती. तेव्हा प्रियांकाच्या हातावरील टॅटू बघून करणने दीपिकाला प्रश्न विचारला होता. "दीपिका तुझ्या टॅटूचं काय झालं?" असं करणने विचारलं होतं. त्यावर दीपिकाने "अजूनही टॅटू आहे" असं उत्तर दिलं होतं. तेव्हा करण तिला "आता राजीव खंडेलवाल तुला डेट करणार आहे का?" असं म्हणाला होता. करणच्या या प्रश्नावर दीपिका प्रियांकाकडे बघत "मी याला कानाखाली मारू का?" असं म्हणाली होती. तेव्हा प्रियांकाने "नक्कीच तू किंवा कोणीतरी हे केलं पाहिजे", असं उत्तर दीपिकाला दिलं होतं.
त्यानंतरही करण जोहर थांबला नाही. तेव्हा दीपिका रणवीर सिंहबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. "K ला S ने अगदी सहजरित्या रिप्लेस करता आलं असतं तर", असं करण म्हणाला होता. कॉफी विथ करणमधील हा व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल झाला आहे. दरम्यान, दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता लवकरच ते आईबाबा होणार आहेत.