हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून अवघ्या ३१ वर्षीय गायकाचा दुर्दैवी मृत्यू, संगीतप्रेमींवर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:52 AM2024-10-17T10:52:48+5:302024-10-17T10:54:37+5:30
जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या ३१ वर्षीय गायकाचं निधन झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर येतेय (liam payne)
जगभरातील संगीतप्रेमींना आज एक मोठा धक्का बसलाय. तो म्हणजे 'वन डायरेक्शन' या लोकप्रिय बँडचा गायक लियाम पायने याचा हॉटेलमध्ये मृत्यु झालाय. अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पायने या गायकाने अखेरचा श्वास घेतलाय. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. तो अवघ्या ३१ वर्षांचा होता. लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. याशिवाय अनेकांनी लियामच्या निधनावर खेद व्यक्त केलाय. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
TMZ पब्लिकेशननुसार लियाम पायने ज्या हॉटेलमध्ये राहत होता तिथे तो काहीतरी विचित्र व्यवहार करत असल्याचा दावा करण्यात आलाय. रिपोर्टमध्ये लिहिल्यानुसार, संध्याकाळी ५ वाजता लियामला हॉटेलच्या लॉबीमध्ये विचित्र गोष्टी करताना बघितलं गेलं होतं. लियामने सुरुवातीला आपला लॅपटॉप घेऊन त्या लॅपटॉपला त्याच्याच खोलीत आग लावली. त्यामुळे लियामच्या मृत्यूचा स्थानिक पोलीस अधिक तपास करत करत आहेत.
We are deeply saddened by the news of Liam Payne's passing. Our thoughts are with his family, friends, and the many fans who loved and supported him. pic.twitter.com/5XCBUgrsqR
— Spotify (@Spotify) October 16, 2024
मृत्यु होण्याच्या एक तास आधी लियाम त्याच्या मोबाईलवरुन स्नॅपचॅटवर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत होता. सोशल मीडियावर लियामने पोस्ट केलेल्या फोटोंकडे नजर गेल्यास हे तेच फोटो आहेत ज्या हॉटेलमध्ये लियाम थांबला होता. पोलिसांनी तपास केल्यावर लियामच्या रुममध्ये खूप सामान मोडकळलेल्या अवस्थेत मिळालं. लियाम 'वन डायरेक्शन' या जगप्रसिद्ध बँडचा माजी गायक असून त्याची अनेक गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. लियामच्या गाण्यांनी सर्वांना वेड लावलंय.