सीआयडी मालिका बंद होणार केवळ अफवा

By Admin | Published: December 23, 2016 02:36 AM2016-12-23T02:36:24+5:302016-12-23T02:36:24+5:30

सीआयडी या मालिकेत एसपी प्रद्युमनचे निधन झाल्याचे दाखवण्याच येणार असून हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या

Only the rumor will stop the CID series | सीआयडी मालिका बंद होणार केवळ अफवा

सीआयडी मालिका बंद होणार केवळ अफवा

googlenewsNext

सीआयडी या मालिकेत एसपी प्रद्युमनचे निधन झाल्याचे दाखवण्याच येणार असून हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत आहेत. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शिवाजी साटम आणि दया शेट्टी यांनी आपले मानधन वाढवण्याची मागणी केल्यामुळे प्रोडक्शन हाऊसने हा कार्यक्रमच बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात होते. पण या सगळ्या केवळ अफवा असून सीआयडी मालिका बंद होणार नसल्याचे खुद्द शिवाजी साटम यांनी सांगितले आहे.
शिवाजी साटम याविषयी सांगतात, ही मालिका बंद होणार आहे का? तसेच माझ्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे का? असे विचारण्यासाठी अनेकांचे फोन येत आहेत. अशा चुकीच्या बातम्या देण्यात कोणाला आनंद मिळतो हेच मला कळत नाहीये. मी माझ्या फॅन्सना सांगू इच्छितो की, या केवळ अफवा असून सीआयडी या मालिकेत एसपी प्रद्युमनचा मृत्यू झालेला दाखवण्यात येणार नाहीये. तसेच ही मालिका बंद होणार असल्याची बातमीदेखील पूर्णपणे चुकीची आहे.

Web Title: Only the rumor will stop the CID series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.