फक्त 'या' तिघांनाच माहीत होते करणचे ' ते' सिक्रेट

By Admin | Published: March 7, 2017 11:50 AM2017-03-07T11:50:25+5:302017-03-07T14:36:35+5:30

करण जोहर पिता बनणार असल्याचे सिक्रेट फक्त त्याच्या तीन मित्रांनाच माहीत होते आणि ते मित्र म्हणजे..

Only 'these' knew that they were 'Secret' | फक्त 'या' तिघांनाच माहीत होते करणचे ' ते' सिक्रेट

फक्त 'या' तिघांनाच माहीत होते करणचे ' ते' सिक्रेट

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - प्रसिद्ध निर्मात-दिग्दर्शक करण जोहर सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा पिता बनल्याची बातमी रविवारी वा-यासारखी पसरली आणि चहुबाजूंनी करणवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. करण जोहरने सरोगसीद्वारे एक मुलगा आणि एका मुलगीला जन्म देत पितृसुख प्राप्त केले. गेल्या महिन्यात या मुलांचा जन्म झाला. स्वत: करणनेही ही गोड बातमी शेअर केली. इतके दिवस या बातमीबाबत पूरेपूर गुप्तता बाळगत करणने ही 'न्यूज' कोणालाही कळू दिली नव्हती.
मात्र इंडस्ट्रीतील तीन व्यक्तींना मात्र करणच्या या ' गुड न्यूज'ची कल्पना होती. त्या तीन व्यक्ती म्हणजे करणचे अगदी जवळचे मित्र अभिनेत्री करीना कपूर खान, शाहरूखची पत्नी गौरी खान आणि विख्यात फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा. करण लवकरच पिता बनणार असल्याचे फक्त या तिघांनाच माहीत होते आणि त्यांनीही त्याबद्दल गुप्तता बाळगली. त्यांच्याशिवाय कोणालाही अगदी धर्मा प्रॉडक्शनमधील कोणत्याही व्यक्तीला करणच्या या निर्णयाची कल्पना नव्हती. तो नेहमीप्रमाण ऑफीसमध्ये येत असल्याने आणि काम करत असल्याने कोणालाच कसलीही कुणकुण लागली नव्हती. 
(करण जोहर विवाहाआधीच बनला बाप!)
 
मुलांची नावं यश आणि रूही
केंद्र सरकारच्या जन्म मृत्यू नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळावरून करण जोहरच्या मुलांच्या जन्माची पुष्टी करण्यात आली. अंधेरी पूर्व येथील मसरानी रुग्णालयात या मुलांचा जन्म झाला. करणने आपल्या वडिलांच्या नावावरून मुलाचे नाव यश आणि आई हिरूच्या नावावरून मुलीचे नाव रुही असे ठेवले आहे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'अॅन अनसुटेबल बॉय' या आपल्या आत्मचरित्रात करण जोहरने  एक मुलाला दत्तक घेण्याची वा सरोगसीद्वारे बाप बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. 
शुक्रवारी करण जोहरच्या जुळ्या मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी पद्मजा केरकर यांनी दिली. दरम्यान, करण जोहरचा जवळचा मित्र असलेल्या शाहरुख खानचे तिसरे अपत्य असलेल्या अबरामचा सरोगसीद्वारे मसरानी रुग्णालयातच जन्म झाला होता.
 
 

Web Title: Only 'these' knew that they were 'Secret'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.