'फ्रेंड्स'मध्ये Phoebe Abbott ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री टेरी गैर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:23 AM2024-10-30T11:23:38+5:302024-10-30T11:24:46+5:30

अभिनेत्री टेरी गैर यांचं निधन झालं आहे.

Oscar-nominated And Comedy Pioneer Teri Garr Dies At Age 79 | Lisa Kudrow Pays Tribute To Friends TV Mom | 'फ्रेंड्स'मध्ये Phoebe Abbott ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री टेरी गैर यांचं निधन

'फ्रेंड्स'मध्ये Phoebe Abbott ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री टेरी गैर यांचं निधन

Teri Garr Dies At 79: नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो 'फ्रेंड्स'मध्ये फोएब अबॉट सीनियरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री टेरी गैर (Teri Garr) यांचे निधन झाले आहे.  वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मिडियावरून याबद्दल सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.

टेरी गैर यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1944 रोजी जन्म झाला होता. अमेरिकन सिटकॉम शो 'फ्रेंड्स'मध्ये त्यांनी फीबी बुफे या पात्राची आई फोबी ॲबॉट सीनियर ही भूमिका साकारली होती. या शोमधील त्यांच्या पात्राला भरभरुन प्रेम मिळालं होतं. 1963 मध्ये नृत्यांगना म्हणून चित्रपटांमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या टेरी गैर यांना त्यांच्या 'टूट्सी' या चित्रपटासाठी ऑस्कर नामांकनही मिळालं होतं.

टेरी गैर यांची पब्लिसिस्ट हेइडी शेफरनुसार, मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे (multiple sclerosis) त्यांचे लॉस एंजेलिसमध्ये  निधन झाले. टेरी गैर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास ७० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या आहेत. टेरी गैर यांच्या आधी त्याचे वडीलही विनोदी अभिनेते होते. अमेरिकन अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. संगीतमय चित्रपटांतून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती.  ऑस्कर, बाफ्टा आणि नॅशनल सोसायटी ऑफ फिल्म क्रिटिक्स यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी त्यांनी नामांकन मिळवलेलं आहे. 
 

Web Title: Oscar-nominated And Comedy Pioneer Teri Garr Dies At Age 79 | Lisa Kudrow Pays Tribute To Friends TV Mom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.