Oscars 2019 : भारतीय निर्माती गुनीत मोंगा यांच्या लघुपटाने जिंकला ऑस्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 10:18 AM2019-02-25T10:18:00+5:302019-02-25T10:20:52+5:30
भारतात मासिक पाळीच्या मान्यतांवर आधारित लघुपट ‘Period. End Of Sentence’ने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले आहे. डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट श्रेणीत या लघुपटाने पुरस्कार पटकावला.
चित्रपटसृष्टीत सर्वाधिक प्रतिष्ठित समजल्या जाणा-या ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या वितरण सोहळ्यास सुरूवात झाली आहे. भारतात मासिक पाळीच्या मान्यतांवर आधारित लघुपट ‘Period. End Of Sentence’ने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले आहे. डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट श्रेणीत या लघुपटाने पुरस्कार पटकावला.
Look who stopped by the #Oscars Thank You Cam, presented by @Cadillac! Best Documentary Short winners for Period. End of Sentence. #KeepRisingpic.twitter.com/NssJfSPkI3
— The Academy (@TheAcademy) February 25, 2019
‘Period. End Of Sentence’ हा चित्रपट भारतात महिलांचा मासिक पाळी आणि या काळात त्यांना येणा-या अडचणी यावर आधारित आहे. २५ मिनिटांच्या या लघुपटात दिल्लीनजिकच्या हापुड जिल्ह्यातील एका गावातील सॅनिटरी नॅपकीन बनवणा-या काही महिलांची कथा रेखाटण्यात आली आहे. इराणी-अमेरिकन दिग्दर्शक रायका जेहताब्जी यांनी या लघुपटाने दिग्दर्शन केले आहे. तर गुनीत मोगा ही भारतीय महिला या लघुपटाची सहनिर्माती आहे.
‘Period. End Of Sentence’ ने ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीत मोंगा यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.
WE WON!!! To every girl on this earth... know that you are a goddess... if heavens are listening... look MA we put @sikhya on the map ❤️
— Guneet Monga (@guneetm) February 25, 2019
आम्ही जिंकलो. हा ऑस्कर पुरस्कार पृथ्वीरच्या सर्व मुलींसाठी...पृथ्वीवरील प्रत्येक मुलीने हे ओळखावे की आपण देवता आहोत, असे गुनीत मोंगा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गुनीत मोंगा यांनी ‘लंच बॉक्स’, ‘मसान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ब्लॅक शीप, एंड गेम, लाइफबोट आणि अ नाईट अॅट दी गार्डन या लघुपटांना मात देत Period. End Of Sentence ने बाजी मारली.