Oscars 2021 Live Updates: नोमाडलँड बेस्ट फिल्म, अँथनी हॉपकिन्स बेस्ट अॅक्टर तर फ्रांसेस मॅकडॉर्मेंड बेस्ट अॅक्ट्रेस; पाहा ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 05:23 AM2021-04-26T05:23:02+5:302021-04-26T09:50:29+5:30
Oscars 2021 Live updates: ऑस्कर पुरस्कार हा एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार मानला जातो. (Oscars 2021)
लॉस एंजलिसमध्ये ९३ व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscars 2021) आता सुरुवात झाली आहे. ऑस्कर सोहळ्यात घुमणारे अँड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी अस्सल हॉलिवूडप्रेमी आसुलेला असतो. तो दिमाखदार सोहळा देखणा असतोच. पण त्याआधी असणारं रेड कारपेटही पाहण्यासारखं असतं. मात्र यंदा नेहमीसारखा साजरा होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याला थोडी कात्री लागणार आहे. जगभरात कोरोनाचा कहर आहे. त्याची दखल घेऊन अनेक गोष्टी यंदा या सोहळ्यात बदलण्यात आल्या आहेत. यंदाचा ९३वा ऑस्कर सोहळा प्रेक्षकांना डिस्ने-हॉटस्टार या ओटीटीवर पाहता येणार आहे. (Oscars 2021 Live updates: 93 rd Academy Awards Winners List and red carpet)
यंदाच्या ऑस्करमध्ये सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे ते मॅंक या चित्रपटावर. या चित्रपटाला यंदा १० नामांकनं मिळालेली आहेत. याशिवाय, द फादर, ज्युडस एंड द ब्लॅक मसाया, मिनारी, द ट्रायल ऑफ द शिकागो ७, नोमॅडलॅंड, प्रॉमिसिंग यंग वूमन, ब्लॅक बॉटम, साऊंड ऑफ मेटल या चित्रपटांचाही यात समावेश आहे. खरंतर ऑस्करचा हा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होतो. पण कोरोनाच्या लाटेमुळे या सोहळ्याला दोन महिने उशिरा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Oscars 2021 Live updates:
नोमाडलँड फिल्मने पटकावले तीन पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदाचा बेस्ट पिक्चर फिल्मचा पुरस्कार नोमाडलँडला मिळाला आहे. तसेच या सिनेमासाठी चुलू जौ हिने बेस्ट डायरेक्टराचा ऑस्कर पटकावला आहे आणि याच चित्रपटासाठी अभिनेत्री फ्रांसेस मॅकडॉर्मेंड हिला बेस्ट अॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
बेस्ट डायरेक्टर
- च्लोए झाओ (Chloe Zhao) यांना नोमाडलँड फिल्मसाठी बेस्ट डायरेक्टरचा ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
बेस्ट अॅक्टर
- अँथनी हॉपकिन्स यांना मँक फिल्मसाठी बेस्ट अॅक्टर ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
It's official! #Oscarspic.twitter.com/PAq8HGGo25
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
बेस्ट अॅक्ट्रेस
- फ्रांसेस मॅकडॉर्मेंड हिला नोमाडलँड फिल्मसाठी बेस्ट अॅक्ट्रेस ऑक्सर पुरस्काराने गौरविण्यात आले.
It's official! #Oscarspic.twitter.com/EgpWAZdKtW
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
इरफान खान आणि ऋषी कपूर यांना श्रद्धांजली
- बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी ऑस्कर पुरस्कार अकादमीकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
बेस्ट अॅक्ट्रेस इन लिडिंग रोल
- फ्रान्सेस मॅकडोर्मंडला नोमाडलँड फिल्मसाठी मिळाला बेस्ट अॅक्ट्रेस इन लिडिंग रोलचा पुरस्कार.
बेस्ट पिक्चर
नोमाडलँड फिल्मसाठी मिळाला बेस्ट पिक्चरचा ऑस्कर पुरस्कार
It's official! #Oscarspic.twitter.com/EjlbzePvqR
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
एन रोथ यांनी ऑस्कर पुरस्कार मिळवून रचला इतिहास
मा रैनीच्या ब्लॅक बॉटमला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. मा रैनीचा ब्लॅक बॉटमला बेस्ट कॉश्च्युम डिझाइनचा पुसस्कार एन रोथ यांना पुरस्कार मिळाला. एन रोथ यांनी हा पुरस्कार प्राप्त करत इतिहास बनवला आहे. त्यांना वयाच्या ८९व्या वर्षी ऑस्कर मिळाला आहे. इतक्या जास्त वयात ऑस्कर मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
बेस्ट ओरिजनल स्कोर
- बेस्ट ओरिजनल स्कोरसाठी सोलला मिळाला ऑस्कर पुरस्कार.
It's official! #Oscarspic.twitter.com/4ocafjHS3C
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
बेस्ट फिल्म इडिटिंग
- Mikkel E.G ला मिळाला साऊंड ऑफ मेटलसाठी पुरस्कार.
It's official! #Oscarspic.twitter.com/yhKWZgsncJ
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
मानवतावादी पुरस्कार
- ऑक्सर २०२१ मध्ये टायलर पेरी यांनी मानवतावादी पुरस्कार पटकावला.
It's official! #Oscarspic.twitter.com/xaFAWRRvJx
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
नोमाडलँडला बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार
या सोहळ्यात ‘नोमाडलँड’ या फिल्मसाठी चुलू जौ हिने बेस्ट डायरेक्टरचा ऑस्कर पुरस्कार पटकावला.
#Oscars Moment: Chloé Zhao accepts the Oscar for Best Directing for @nomadlandfilm. pic.twitter.com/1W1zPSxEWS
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
बेस्ट समोर्टिंग अॅक्ट्रेस
- यून यू-जंग हिला फिल्म मिनारीसाठी बेस्ट समोर्टिंग अॅक्ट्रेसचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
It's official! #Oscarspic.twitter.com/iyJQUV68q2
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
बेस्ट सिनेमॅटॉग्राफी
एरिक मेसेर्समिडटला मँकसाठी मिळाला बेस्ट सिनेमॅटॉग्राफीचा ऑस्कर पुरस्कार आहे. दरम्यान, डेव्हिड फिन्चरच्या या फिल्मला हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे.
It's official! #Oscarspic.twitter.com/aiezSq9Fpm
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
बेस्ट व्हिज्युल इफेक्ट्स
बेस्ट व्हिज्युल इफेक्ट्ससाठी टेनेटने पटकावला ऑस्कर पुरस्कार, तर मँकने बेस्ट प्रोडक्ट डिसाइनसाठी आपला पहिला ऑस्कर पुरस्कार जिंकला.
बेस्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म
सोलला मिळाला बेस्ट अॅनिमेटड फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार.
बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर
माई ऑक्टोपस टीचर फिल्मसाठी बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचरचा ऑस्कर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
It's official! #Oscarspic.twitter.com/TUgAk7LCPT
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
बेस्ट अॅक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल (नॉमिनेशन)
- मारिया बकलोवा - Borat Subsequent Moviefilm
- ग्लेन क्लोज - Hillbilly Elegy
- ओलिविया कोलमॅन - The Father
- यून यू-जंग - Minari
बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिंग रोल (नॉमिनेशन)
- साशा बॅरन कोहेन - The Trial of the Chicago 7
- डेनियल कालूया - Judas and the Black Messiah
- लेस्ली ओडोम ज्युनियर - One Night in Miami
- पॉल राची - Sound of Metal
- लेकिथ स्टॅनफील्ड - Judas and the Black Messiah
९३व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
Scenes from the #Oscars red carpet. pic.twitter.com/vJL9zJID2z
— The Academy (@TheAcademy) April 25, 2021
अधिकृत संकेतस्थळांवर संपूर्ण नामांकनांची यादी...
ऑस्करच्या Oscar.com या अधिकृत संकेतस्थळांवर संपूर्ण नामांकने पाहू शकता. तसेच ऑस्करच्या सोशल मीडिया हँडल्सवरही याची संपूर्ण यादी उपलब्ध आहे.
1 hour to go 🖤 https://t.co/rIdhzkAd7o
— Celeste (@celeste) April 25, 2021
- हॉलिवूड अभिनेत्री व्हायोला डेव्हिसने रेड कार्पेटवर
Viola Davis brings ethereal glamour to 2021 Oscars in stunning white gown
— ANI Digital (@ani_digital) April 26, 2021
Read @ANI Story | https://t.co/suY7uCAQF0pic.twitter.com/wMIpUplp3G
- प्रॉमिसिंग यंग वुमेन चित्रपटाच्या सर्वोतकृष्ट पटकथा म्हणून Emerald Fennell हिने ऑस्कर पटकावला आहे.
congrats to a truly promising young woman, @emeraldfennell ✨✨✨@TheAcademy#Oscar2021pic.twitter.com/Tuobfpqahq
— GIPHY Pop (@GiphyPop) April 26, 2021
आंतरराष्ट्रीय फिचर फिल्मसाठी डेनमार्क यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
It's official! #Oscarspic.twitter.com/0UbupYBwL6
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार हा एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार मानला जातो. ऑस्कर नामांकनांच्या यादीमध्ये स्थान मिळावे यासाठी तसेच पुरस्कारासाठीच्या शर्यतीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी जगभरातील फिल्म मेकर्स खूप प्रयत्न करतात. जगभरात सर्वाधिक चर्चेत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी केवळ नऊ चित्रपट अंतिम निवडीपर्यंत पोहोचतात आणि त्यापैकी फक्त पहिल्या पाच चित्रपटांना नामांकन मिळते आणि त्यापैकी एक चित्रपटाला ऑस्कर दिला जातो.