पद्मावत या चित्रपटाने ओलांडला २०० करोडचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 11:50 AM2018-02-06T11:50:05+5:302018-02-06T17:20:05+5:30
प्रचंड वादानंतरही पद्मावत हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. वास्तविक हा चित्रपट देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये ...
प रचंड वादानंतरही पद्मावत हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. वास्तविक हा चित्रपट देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये प्रदर्शित होऊ दिला नाही, मात्र अशातही चित्रपटाच्या कमाईचे आकडे डोळे दिपवणारे आहेत. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही चित्रपट प्रचंड कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन ३०० कोटींपेक्षा अधिक केले आहे, तर देशांतर्गत आतापर्यंतची कमाई २०० कोटी इतकी आहे.
पद्मावत या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा टप्पा पार पाडला होता. आता या चित्रपटाने २०० कोटी हून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला मिळालेल्या या यशाबद्दल या चित्रपटाची टीम चांगलीच खूश आहे. ‘वायकॉम १८ मोशन पिक्चर्स’कडून देण्यात आलेली माहिती आणि चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार पद्मावतने भारतात आतापर्यंत २१२. ५० कोटींचा गल्ला जमवला आहे.
पद्मावत या चित्रपटात शाहीद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साली यांनी केले आहे. हम दिल दे चुके सनम, बाजीराव मस्तानी यांसारखे अनेक हिट चित्रपट संजय लीला भन्साली यांनी बॉलिवूडला दिले आहेत. पद्मावत या चित्रपटासाठी रणवीर सिंगचे विशेष कौतुक होत आहे. त्याच्या करियरमधील हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला तगडे आव्हान देणारा कोणताही चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाहीये. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईची घौडदौड सुरूच आहे. ९ फेब्रुवारीला अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला पॅडमॅन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर देखील पद्मावतची जादू कायम राहाते का हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
२५ जानेवारीला रिलीज झालेल्या पद्मावतने पेड प्रिव्ह्यूमध्येच पाच कोटी रुपये कमावले होते, तर रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी १९ कोटी, शुक्रवारी ३२ कोटी, शनिवारी २७ कोटी, रविवारी ३१ कोटी कमवत पहिल्याच आठवड्यात अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला होता.
Also Read : दीपिका पादुकोण पद्मावती नंतर बनणार लेडी डॉन