रंगतदार परफॉर्मन्सने आणली बहार!

By Admin | Published: July 16, 2017 02:27 AM2017-07-16T02:27:18+5:302017-07-16T02:27:18+5:30

आयफा पुरस्कार सोहळ्यात आॅस्कर पुरस्कार विजेता गायक ए.आर. रेहमान यांच्या खास परफॉर्मन्सने ही रात्र अधिक रंगतदार बनली होती. ए.आर.रेहमान यांच्या संगीत

Painted performance brought out! | रंगतदार परफॉर्मन्सने आणली बहार!

रंगतदार परफॉर्मन्सने आणली बहार!

googlenewsNext

आयफा पुरस्कार सोहळ्यात आॅस्कर पुरस्कार विजेता गायक ए.आर. रेहमान यांच्या खास परफॉर्मन्सने ही रात्र अधिक रंगतदार बनली होती. ए.आर.रेहमान यांच्या संगीत कारकिदीर्ला प्रकाशझोत टाकणारा या कार्यक्रमाने सोहळ्यात बहारदार रंगत आणली. रेहमानसोबत मोठ्या संख्येने त्याचे सहकारी या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. ३० जणांच्या या क्रू मेंबरमध्ये संगीतकार, डान्सर्स आणि तंत्रज्ञ यांचा समावेश होता. मुंबई आणि लॉस एंजिलिसमधून हे सगळे जण या खास परफॉर्मन्ससाठी आले होते. या सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी दोन दिवसांपासून रेहमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जोरदार सराव केला होता. नुकतंच लंडनमधील रेहमानच्या कॉन्सर्टमधून संगीतप्रेमींनी काढता पाय घेतला होता. रेहमाननं मोजकीच हिंदी गाणी सादर केल्यामुळे लंडनमधील संगीत रसिक नाराज झाले होते. मात्र, न्यूयॉर्कमध्ये रेहमानच्या कॉन्सर्टला रसिकांचा तुफान रिस्पॉन्स मिळाल्याचे पाहायला मिळाले. ‘दिल से रे’ या गाण्यापासून ते ‘नादान परिंदे’, ‘दिल है छोटा सा’ अशी एक से बढकर एक गाणी या कॉन्सर्टमध्ये सादर करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एका सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी रेहमानच्या वतीने वन हार्ट या उपक्रमाची घोषणा केली. या माध्यमातून संगीतकारांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करण्यात येईल.

Web Title: Painted performance brought out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.