आदेश भावोजींसोबत आदिवासी पाड्यात रंगणार पैठणीचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:07 PM2018-11-01T12:07:58+5:302018-11-01T12:24:21+5:30

दिवाळीनिमित्त यावेळी भाऊजी खोपोली चौक फाटा जवळील पिरकड वाडी आणि अर्कस वाडी या आदिवासी पाड्यात गेले आणि तेथील वहिनींसोबत पैठणीचा खेळ खेळाला. जिथे जाण्यासाठी वाहनांची सोय होत नाही अशा ठिकाणी भाऊजी तेथील वहिनींची दिवाळी अजून आनंदी करण्यासाठी गेले.

Paithani's game to play in the tribal pad with order Bhojoji | आदेश भावोजींसोबत आदिवासी पाड्यात रंगणार पैठणीचा खेळ

आदेश भावोजींसोबत आदिवासी पाड्यात रंगणार पैठणीचा खेळ

googlenewsNext

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. गेली १४ वर्ष हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या घराघरात पोहोचला असून सगळ्यांचं अविरत मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होममिनिस्टरमध्ये दिवाळी निमित्त पैठणीचा खेळ आदिवासी पाड्यात रंगणार आहे.

दिवाळी म्हणजे दिवे आणि रोषणाई. दिवाळीचा प्रत्येक दिवस म्हणजे चविष्ट पदार्थांची रेलचेल आणि नटून थटून तयार होणं. अशा वेळी जर वहिनींना पैठणी मिळाली तर त्याचा आनंद वेगळाच. दिवाळीनिमित्त यावेळी भाऊजी खोपोली चौक फाटा जवळील पिरकड वाडी आणि अर्कस वाडी या आदिवासी पाड्यात गेले आणि तेथील वहिनींसोबत पैठणीचा खेळ खेळाला. जिथे जाण्यासाठी वाहनांची सोय होत नाही अशा ठिकाणी भाऊजी तेथील वहिनींची दिवाळी अजून आनंदी करण्यासाठी गेले. या वहिनींचा निरागसपणा आणि त्यांचा खडतर प्रवास या भागातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. खेळ आणि गप्पांसोबत तेथील वहिनींमध्ये साखर, तेल आणि फराळ वाटप करण्यात आले.

जाणून घ्या आदेश बांदेकर आणि त्याची पत्नी सुचित्रा बांदेकर यांचे इंटरेस्टिंग लव्हस्टोरीविषयी खास किस्सा

आदेश सुचित्रा यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे सुचित्रा यांच्या शाळेच्या इथे आदेश अनेक वेळा जात असे. त्यांना पाहून माझा पाठलाग करू नकोस, मी काही तूला होकार देणार नाही असे सुचित्रा त्यांना बोलली होती. पण आदेश यांनी सुचित्रा यांना दादरच्या एक हॉटेलमध्ये भेटायला बोलवले. सुचित्रा आदेश यांना भेटायला जाण्यासाठी एका मैत्रिणीला सोबत घेऊन निघाल्या. पण त्यांना भीती वाटत असल्याने त्या हॉटेलमध्ये न जाता दादरमध्ये दुसरी कडेच फिरत राहिल्या. आदेश त्यांची अनेक तास वाट पाहत बसले होते. पण त्या काही आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी ते सुचित्रा यांच्या घरी गेले. पण सुचित्रा घरी पोहोचल्याच नव्हत्या. 

पण काहीच वेळात त्या घरी आल्या आणि आदेश यांना आपल्या घरात पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. आदेश मस्त त्यांच्या आईशी गप्पा मारत होत्या. त्यानंतर सुचित्रा यांच्या आईला बाहेर जायचे होते, म्हणून आदेश आईसोबतच निघाले. पण बस स्टॉपला गेल्यावर मला एक काम आहे असे कारण देत तिथून निघून गेले आणि त्यांनी थेट सुचित्रा यांचे घर गाठले. सुचित्रा यांनी दरवाजा उघडला तर आदेश खूप चिडलेले होते. मला हो तर हो नाही तर नाही सांग मी तुला पुन्हा विचारणार नाही. आज मी तुला महालक्ष्मीला घेऊन जाणार होतो. मी तुला पाच मिनिटे देतो मला उत्तर दे असे आदेश म्हणाले. त्यावर थोड्याच वेळात महालक्ष्मीला कधी जायचे असे सुचित्राने आदेशला विचारले. आदेश यांनी अशा वेगळ्यात अंदाजात सुचित्राच्या घरात त्यांना प्रपोज केले होते.

Web Title: Paithani's game to play in the tribal pad with order Bhojoji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.