पाकिस्तानी अभिनेता अली जफर अडचणीत; ‘मलाला’चे नाव घेतल्याने द्यावे लागले स्पष्टीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 06:37 PM2019-04-28T18:37:24+5:302019-04-28T18:38:14+5:30
पाकिस्तानी अभिनेता अली जफर बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा चर्चेत आलाय. त्याचे कारणही तसेच आहे. ताज्या घडामोडींनुसार, अली जफर याने मीशा ...
पाकिस्तानी अभिनेता अली जफर बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा चर्चेत आलाय. त्याचे कारणही तसेच आहे. ताज्या घडामोडींनुसार, अली जफर याने मीशा शफी यांच्यावर निशाणा साधत मलाला यांचे नाव उच्चारले अन् त्याच्या वक्तव्याने अनेकांची नाराजी त्याने ओढवली आहे. सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. टीकाटिप्पणी थांबवण्यासाठी मग त्याने टिष्ट्वट करून जाहीरपणे काही गोष्टींचे स्पष्टीकरण केले.
So Ali Zafar thinks Meesha Shafi's sexual harassment allegations against him are for a Canadian immigration and that she wants to become Malala? Absolutely, shameless this man is. #MeToopic.twitter.com/Y6yipjLRJj
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) April 27, 2019
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अभिनेत्री मीशा शफी यांनी अली जफर यांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अलीने मग कोर्टाचा दरवाजा ठोठावला. पाकिस्तानी कोर्टाने त्याच्यावर लागलेले आरोप फेटाळले. त्यानंतर अली जफरने मीडियासमोर सांगितले की, ‘ज्या लोकांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी स्वत:च्या फायद्यांसाठी काही गोष्टी केल्या आणि स्वत: मात्र कॅनडाला निघून गेले. मला वैयक्तिक फायद्यांसाठी निशाना बनवले गेले. मला नाही वाटत की, असं करून ती काय दुसरी मलाला बनून जगात मिरवणार होती का?’
Is being @Malala something to be ashamed of? @AliZafarsayshttps://t.co/8Uc1vhxEZt
— Maria Memon (@Maria_Memon) April 27, 2019
Wtf? Malala banna chahtee theen? Malala is a Nobel Prize Winner from Pakistan, why are you using her name pejoratively? https://t.co/49Z3KykVkF
— Mahwash Ajaz (@mahwashajaz_) April 27, 2019
अली जफरच्या या वक्तव्याचा निषेध करत त्याला सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. या प्रकरणात मलाला यांचे नाव घेण्याची काय गरज होती? मलाला बनणे हे लाजीरवाणे आहे. यानंतर प्रश्नांना थांबवत अलीने मलाला यांचे कौतुक करायला सुरूवात केली. त्याने टिष्ट्वट केले की,‘ मलाला या खऱ्या प्रामाणिक योद्धा आहेत, त्यांनी अनेक बलिदान दिले. मीशा कधीही मलाला बनू शकणार नाही.’
#Malala is a true warrior who stands for truth and justice having made great sacrifices. Meesha cannot become her by lying and running away from justice hiding behind fake profiles on social media. #FaceTheCourtMeeshaShafi
— Ali Zafar (@AliZafarsays) April 27, 2019