"आमच्या कलाकारांना ते घाबरतात कारण.."; पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूडच्या 'खान'दानवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:44 AM2024-04-05T11:44:12+5:302024-04-05T11:47:17+5:30

पाकिस्तानी कलाकारांचं कौतुक करून नादिया खानने बॉलिवूडवर टीका केली आहे. काय म्हणाली नादिया वाचा

pakistani actres nadiya Khan slam shahrukh salman aamir khan that insecure with pakistani actors | "आमच्या कलाकारांना ते घाबरतात कारण.."; पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूडच्या 'खान'दानवर टीका

"आमच्या कलाकारांना ते घाबरतात कारण.."; पाकिस्तानी अभिनेत्रीची बॉलिवूडच्या 'खान'दानवर टीका

पाकिस्तानी कलाकारांना सध्या भारतात काम करण्यावर बंदी आहे. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर नादिया खानने सलमान-शाहरुख-आमिर खानवर टीका केली आहे. नादिया पाकिस्तानी शो 'क्या ड्रामा है' मध्ये सहभागी झाली होती. तेव्हा नादियाने शाहरुख - सलमान - आमिर खानवर टीका केली. बॉलिवूडचं 'खान'दान पाकिस्तानी अभिनेत्यांना घाबरतात असं नादिया म्हणाली. 

नादिया खान या शोमध्ये म्हणाली, "हिंदी सिनेमांमध्ये काम केल्यामुळे संपूर्ण भारतात पाकिस्तानी स्टार्स लोकप्रिय आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे भारतातले अनेक आघाडीचे अभिनेते पाकिस्तानी अभिनेत्यांना घाबरतात. त्यामुळे राजकीय कारणं सांगून त्यांनी दोन देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. भारतातील फक्त राजकीय नेत्यांनाच नाही तर कलाकारांनाही आमच्यापासून अडचण आहे."

नादिया खान पुढे म्हणाली, "ही फक्त सिनेमांपुरती संबंधित गोष्ट नाही तर भारतीय प्रेक्षक पाकिस्तानी कलाकरांवर प्रेम करतात. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी टॅलेंटवर प्रतिबंध लावला आहे. इतकंच नव्हे तर भारतात जे खान्स आहेत त्यांनाही पाकिस्तानी कलाकारांबद्दल असुरक्षितता वाटते. जर पाकिस्तानी कलाकारांनी सिनेमे गाजवले तर आम्ही काय करणार? अशी भीती त्यांना वाटते." अशाप्रकारे नादिया खानने सलमान - आमिर - शाहरुखवर टीका केली आहे. नादियाच्या या वक्तव्यावर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घातली.

Web Title: pakistani actres nadiya Khan slam shahrukh salman aamir khan that insecure with pakistani actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.