प्रेग्नंसी फोटोशुट हे 'धर्माविरोधी' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 09:43 AM2022-12-05T09:43:13+5:302022-12-05T09:47:02+5:30

अरमीनाने आपल्या पतीसोबत पोज देत काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे.

pakistani-actress-slams-trollers-regarding-her-pregnancy-photoshoot-her-reply-went-viral | प्रेग्नंसी फोटोशुट हे 'धर्माविरोधी' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

प्रेग्नंसी फोटोशुट हे 'धर्माविरोधी' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

googlenewsNext

अरमीना राणा खान ही प्रसिद्ध 'पाकिस्तानी' अभिनेत्री आहे. सध्या ती प्रेग्नंट असून हा काळ एंजॉय करत आहे. सोशल मीडियावर तिने काही प्रेग्नंसी शूटचे फोटो पोस्ट केले. हे काही पाकिस्तानी नागरिकांना पचलेले दिसत नाही. त्यांनी सोशल मीडियावरच अभिनेत्रीला खुप सुनावले. आता मात्र अरमीना ने सुद्धा ट्रोलर्स ला सडेतोड उत्तर दिले आहे. (Pakistani Actress Armeena Khan)

अरमीनाने आपल्या पतीसोबत पोज देत काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे. यावर पाकिस्तानी ट्रोलर्स नी मात्र तिला खुप सुनावले. असे फोटोशुट धर्माच्या विरोधात असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर अगदी गलिच्छ भाषेत तिच्यावर टीका केली. हॉलिवुडची कॉपी असे देखील म्हणले गेले. 



यावर अरमीना ने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. मला या ट्रोलिंगवर खरे तर हसू येत आहे. सकाळपासून उडत आहेत. अनेक जण मला माकड बोलले म्हणून अरमीना नेही हॅशटॅग बंदर बंदरिया असे लिहिले. जेव्हा तुम्हाला रस्त्यावर चालताना एखादी प्रेग्नंट बाई दिसते तर तुम्ही काय नजर चोरता का मोठा चष्मा घालता. २१ व्या शतकातही महिलेवर अशा प्रकारची टीका होत असेल तर हे दुर्दैवी आहे

.

महिलांवरील दबाव, बंधने हे आजही बंद झालेले दिसत नाही.  पाकिस्तानात तर महिलांवर काय अत्याचार होत असतील याचा विचारही करवणार नाही. आजही अनेक गोष्टी या धर्माशी जोडल्या जातात याहुन दुर्दैवी ते काय असेल,

Web Title: pakistani-actress-slams-trollers-regarding-her-pregnancy-photoshoot-her-reply-went-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.