कुरापतखोर पाकची आणखी एक कुरापत, विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर बनवणार कॉमेडी सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 01:21 PM2019-08-27T13:21:03+5:302019-08-27T13:22:34+5:30
कुरापतखोर पाकिस्तानच्या कुरापती थांबता थांबेनात. भारताने जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान संतापला आहे आणि यातच भारताला अनेक प्रकारे डिवचण्याचे पाकचे प्रयत्न सुरु आहेत.
कुरापतखोर पाकिस्तानच्या कुरापती थांबता थांबेनात. भारताने जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान संतापला आहे आणि यातच भारताला अनेक प्रकारे डिवचण्याचे पाकचे प्रयत्न सुरु आहेत. आता पाकने भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर एक कॉमेडी सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. ‘अभिनंदन कम ऑन’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.
#NewsUpdate: #KhalilUrRehmanQamar confirms to make a comedy film titled "Abhinandan Come On" and @shamoonAbbasi will be playing the role of Indian pilot Abhinandan in it. Film will go on floors before the release of #KaafKangana.#AbhinandanComeOnpic.twitter.com/4Pkm9a5Xm4
— Pakistani Cinema (@PakistaniCinema) August 25, 2019
भारतातील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. याचदरम्यान पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली होती आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. पाकिस्तानने लगेच त्यांना कैदेत घेतले होते.
कैदेत असताना त्यांच्याकडून भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला होता. अभिनंदन बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो ठरले होते. भारताने या हिरोवर चित्रपट काढण्याची घोषणा केली आणि पाकिस्तानचा तीळपापड झाला. याला उत्तर म्हणून पाकिस्तानी लेखक खलील-उर-रहमान कमर याने अभिनंदन वर्धमान यांच्यावर कॉमेडी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता शमून अब्बासी अभिनंदन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 27 फेब्रुवारी 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच तारखेला पाकिस्तानने अभिनंदन यांना पकडले होते.