आरारारा खतरनाक! Shweta Tiwari ने मुलगी पलकसोबत केला धमाकेदार डान्स, यूजर्स म्हणाले - आई वरचढ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 12:47 PM2021-11-09T12:47:37+5:302021-11-09T12:50:11+5:30

Shweta-Palak Tiwari Video : दोन्ही मायलेकींनी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये पलकला काही स्टेपला अडखळताना बघितलं जाऊ शकतं.

Palak and Shweta Tiwari shakes leg on punjabi bijlee song fan ask are they sisters | आरारारा खतरनाक! Shweta Tiwari ने मुलगी पलकसोबत केला धमाकेदार डान्स, यूजर्स म्हणाले - आई वरचढ आहे.

आरारारा खतरनाक! Shweta Tiwari ने मुलगी पलकसोबत केला धमाकेदार डान्स, यूजर्स म्हणाले - आई वरचढ आहे.

googlenewsNext

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) अलिकडे सोशल मीडियावर फारच चर्चेत असते. मुलगी पलक तिवारीसोबत (Palak Tiwari) आई श्वेताचं बॉंन्डिंग लोकांना फारच आवडतं. दोघीही माय-लेकी एकमेकींसोबत खूप मस्ती करतात. नुकताच श्वेताने पलकसोबत एका पंजाबी गाण्यावर डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

या व्हिडीओत श्वेता आणि पलक हार्डी सिंधूचं पंजाबी  हिट गाणं 'बिजली बिजली' वर डान्स केला आहे. श्वेता व्हाइट टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये तर पलक लेदर ब्राउन पॅंट्स आणि मॅचिंग टॉपमध्ये दिसली. दोन्ही मायलेकींनी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये पलकला काही स्टेपला अडखळताना बघितलं जाऊ शकतं. पण श्वेताने प्रत्येक बिटवर डान्स केला.

या व्हिडीओवर त्यांच्या फॅन्ससोबतच अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. त्यांचे फॅन्स तर दोघींचं इतकं कौतुक करत आहेत की, थकत नाहीयेत. एका यूजरने लिहिलं की, 'या आई-मुलीच्या जोडीला सलाम, श्वेता तिवारी खरंच एक योद्धा आहे आणि दमदार महिला आहे'. एकाने लिहिलं की, 'आई, मुलीपेक्षा वरचढ आहे'. तर एकजण म्हणाला की, दोघी बहिणी आहेत.

श्वेता आणि पलकचा हा पहिलाच व्हिडीओ नाहीये. याआधी त्यांनी अनेक डान्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. पलकने रोजी द सॅफरन चॅप्टर सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल मिश्राने केलं आहे. यात अरबाज खान, मल्लिका शेरावत आणि विवेक ओबेरॉयही आहेत.
 

Web Title: Palak and Shweta Tiwari shakes leg on punjabi bijlee song fan ask are they sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.