'पंचायत 3'मध्ये सर्वांची लाडकी 'अम्मा' नेमकी आहे तरी कोण? याआधीही गाजवलंय बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:06 AM2024-05-29T10:06:40+5:302024-05-29T10:15:14+5:30

'पंचायत 3'मध्ये जगमोहनच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने चांगलाच भाव खाल्लाय. कोण आहेत ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री (panchayat 3, abha sharma)

panchayat 3 fame jagmohan amma actress abha sharma biography and other details | 'पंचायत 3'मध्ये सर्वांची लाडकी 'अम्मा' नेमकी आहे तरी कोण? याआधीही गाजवलंय बॉलिवूड

'पंचायत 3'मध्ये सर्वांची लाडकी 'अम्मा' नेमकी आहे तरी कोण? याआधीही गाजवलंय बॉलिवूड

'पंचायत 3' वेबसिरीजची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'पंचायत 3' मध्ये पुन्हा एकदा फुलेरा गावाची कहाणी विनोदी पद्धतीने पाहायला मिळतेय.  सचिव, प्रधान, मंजू देवी, विकास, प्रल्हाद अशा सर्व व्यक्तिरेखांची हसता हसता डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट 'पंचायत 3' मधून बघायला मिळतेय. 'पंचायत 3' मध्ये यावेळी सर्वांपेक्षा जास्त भाव खाऊन गेलीय ती म्हणजे जगमोहनची अम्मा. कोण आहेत या अभिनेत्री? 

जगमोहनची अम्मा साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

जगमोहनची आईच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे आभा शर्मा. ज्येष्ठ अभिनेत्री आभा शर्मा लखनऊमधील लालकुआ येथे राहतात. आशा शर्मा यांचे मॅनेजर आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्यानुसार आभा यांनी याआधी दोन सिनेमांमध्ये काम केलंय. पण हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होऊ शकले नाहीत. याशिवाय आभा यांनी अर्जून कपूर-परिणीती चोप्रा यांच्या 'इश्कजादे' सिनेमात अभिनय केलाय. 

'पंचायत 3' साठी आभा यांनी ऑडिशन दिली

'पंचायत 3' साठी आभा शर्मा यांनी ऑडिशन दिली. ऑडिशन दिल्यावरच त्यांची 'पंचायत 3' साठी निवड झाल्याचं सांगण्यात येतंय. आभा लवकरच पंकज त्रिपाठी यांच्यासोबत आगामी सिनेमात अभिनय करताना दिसणार आहेत. 'पंचायत 3' मध्ये आभा यांनी जगमोहनच्या आईची भूमिका अत्यंत वास्तववादी पद्धतीने साकारली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी त्या सचिवजी, प्रधान यांना जेरीस आणतात. आभा यांचा नाटकी तरीही प्रेमळ अभिनय हसवता हसवता नकळत भावूक करुन जातो. 

 

Web Title: panchayat 3 fame jagmohan amma actress abha sharma biography and other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.