'कॅप्टन झाल्यावर तुम्हाला नियम कळतात', नॉमिनेशन टास्कमध्ये पॅडीचा अरबाजला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:08 AM2024-08-22T10:08:56+5:302024-08-22T10:10:35+5:30

बिग बॉस मराठीच्या घरात आज नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये पॅडी आणि अरबाजमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे (bigg boss marathi 5)

pandharinath kamble fight with arbaz patel in bigg boss marathi 5 | 'कॅप्टन झाल्यावर तुम्हाला नियम कळतात', नॉमिनेशन टास्कमध्ये पॅडीचा अरबाजला सणसणीत टोला

'कॅप्टन झाल्यावर तुम्हाला नियम कळतात', नॉमिनेशन टास्कमध्ये पॅडीचा अरबाजला सणसणीत टोला

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत. घरात चौथा आठवडा सुरु झालाय. चौथ्या आठवड्यात सुद्धा घरात चांगलाच  राडा झालेला दिसतोय. या आठवड्यात जान्हवीने केलेला पॅडीचा अपमान चांगलाच गाजला. पुढे जान्हवीने कालच्या भागात पॅडीची माफीही मागितली.  नव्या सीझनमधील एका पेक्षा एक भन्नाट टास्क 'बिग बॉस प्रेमींचं' लक्ष वेधून घेत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे.

नॉमिनेशन टास्कमध्ये वादाची ठिणगी

'बिग बॉस मराठी'चा आजचा नॉमिनेशन कार्याचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्य आपल्या गळ्यातील फोटो चुलीत टाकून योग्य कारण देत नॉमिनेट करताना दिसत आहेत. जान्हवीने आर्याचा फोटो गळ्यात टाकला असून ती म्हणतेय,"हिचा फोटो गळ्यात टाकून फिरण्याची माझ्यावर वेळ आली आहे". दरम्यान पॅडी अरबाजला म्हणतोय,"कॅप्टन झाल्यानंतरच सगळे नियम लक्षात येतात". तर अभिजीत म्हणतोय,"चुकीचं करतोयस...आज नाहीतर उद्या तुला हे भोगावंच लागेल". आता अरबाजने नेमकं काय केलं ज्यामुळे सर्व त्याच्यावर भडकले हे आजच्या भागात पाहायला मिळेलच. 


कोण होणार या आठवड्यात नॉमिनेट

'बिग बॉस मराठी'च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत. या आठवड्यात कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठीच घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी या आठवड्यात एक सदस्य घराबाहेर जाईल. त्यामुळे आजच्या भागात कोण नॉमिनेट होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: pandharinath kamble fight with arbaz patel in bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.