"माझी उंची कमी असल्याने मी तिला..."; कांदेपोहे कार्यक्रमावेळी पॅडी कांबळेने बायकोला काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:59 PM2024-08-08T12:59:26+5:302024-08-08T12:59:40+5:30

बिग बॉस मराठीमध्ये सहभागी असलेला पॅडी कांबळेंचा कांदेपोह्यांचा कार्यक्रम कसा होता याचा धमाल किस्सा त्याने सांगितलाय (bigg boss marathi 5, pandharinath kamble)

pandharinath paddy kamble talk about first meeting with his wife anita kamble bigg boss marathi 5 | "माझी उंची कमी असल्याने मी तिला..."; कांदेपोहे कार्यक्रमावेळी पॅडी कांबळेने बायकोला काय सांगितलं?

"माझी उंची कमी असल्याने मी तिला..."; कांदेपोहे कार्यक्रमावेळी पॅडी कांबळेने बायकोला काय सांगितलं?

'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक बहुढंगी स्वभावाचे स्पर्धक सहभागी आहेत. याच स्पर्धकांपैकी एक स्पर्धक म्हणजे पॅडी कांबळे. पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे हा मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका अभिनेता. पॅडी बिग बॉसच्या घरातही चांगला खेळ खेळतोय. पॅडीच्या कुटुंबाविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पॅडीचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्याच्या पत्नीचं नाव आहे अनिता कांबळे. अनिता आणि पॅडीचा कांदेपोह्यांचा कार्यक्रम कसा होता, याचा खुलासा पॅडीने केला होता. 

असा होता पॅडी-अनिताचा कांदोपोह्यांचा कार्यक्रम

पॅडी-अनिताचं अरेंज मॅरेज आहे. जेव्हा पॅडी अनिताला बघायला तिच्या घरी गेला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे भाऊ, आत्या, भाऊजी अशी घरातील मंडळी होती. पॅडीच्या कुटुंंबामध्ये प्रत्येकाची उंची बऱ्यापैकी सारखी आहे. अशातच जेव्हा अनिता चहा घेऊन आली तेव्हा ती पॅडीजवळ चहाचा ट्रे घेऊन आली. पॅडी चहा घेणार तोच तिने ट्रे दुुसरीकडे वळवला. वडीलधाऱ्या मंडळींना आधी चहा देऊ या उद्देशाने अनिता पॅडीला चहा न देता दुसरीकडे गेली. हा धमाल किस्सा पॅडीने कलर्स मराठीवरील 'दर्शन' या मालिकेत अलका कुबल यांच्याशी संवाद साधताना सांगितला होता.


 

पॅडीने बायकोला दिली उंचीची कल्पना

कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाल्यावर पॅडीने बायकोला त्याच्या उंचीची कल्पना दिली. पॅडीच्या बायकोची उंची त्याच्यापेक्षा २ इंचांनी मोठी आहे. त्यामुळे बघण्याच्या कार्यक्रमाला पॅडी तिला म्हणाला होता, "माझी उंची ५ फूट १ इंच आहे. तेव्हा आताच विचार कर. नाहीतर तुला पुढे असं नको वाटायला की नवरा बुटका वगैरे."  यावर अनिताने उत्तर दिलं होतं की, "उंची वगैरे काही नसतं. आपले विचार जुळणं महत्वाचं" पुढे १३ डिसेंबर १९९९ ला पॅडीने अनितासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुली आहेत.

Web Title: pandharinath paddy kamble talk about first meeting with his wife anita kamble bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.