'बाबूरावच्या भूमिकेला कंटाळलो'; 'हेराफेरी'विषयी परेश रावल यांचं मोठ वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 05:30 PM2021-10-28T17:30:00+5:302021-10-28T17:30:00+5:30

Paresh rawa: l२००० साली प्रियदर्शन यांनी 'हेरा फेरी' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात परेश रावलसोबत अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते.  

paresh rawal says he is sick and tired of his baburao image wants to get rid of it | 'बाबूरावच्या भूमिकेला कंटाळलो'; 'हेराफेरी'विषयी परेश रावल यांचं मोठ वक्तव्य

'बाबूरावच्या भूमिकेला कंटाळलो'; 'हेराफेरी'विषयी परेश रावल यांचं मोठ वक्तव्य

googlenewsNext

बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे 'हेरा फेरी' (hera pheri). आजवरच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट विनोदीपटांपैकी हेरा फेरीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २१ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही.  अक्षय कुमार (akshay kumar), सुनील शेट्टी (suniel shetty) आणि परेश रावल (paresh rawal)  यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना तुफान आवडली होती. त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वल 'फिर हेरा फेरी'देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिक्वलमध्येदेखील हे तीन कलाकार झळकले होते. त्यातच बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका दोन्ही चित्रपटांमध्ये तितकीच गाजली. परंतु, आता या भूमिकेचा कंटाळा आलाय असं परेश रावल यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' हे दोन्ही चित्रपट गाजल्यानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहात आहेत. मात्र, या फ्रेंचायझीमधून परेश रावल यांनी आता काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येतं. पहिल्या भागात जो निरागसपणा होता तो दुसऱ्या भागात पाहायला मिळाला नाही. 

"सोशल मीडियावर या चित्रपटाशी निगडीत अनेक मीम्स किंवा माझे संवाद व्हायरल होत असतात. पण मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय. सगळ्यामध्ये तोच तो पणा आला आहे. हेरा फेरीमध्ये जे काही घडलं त्यावेळी आम्ही सगळे निरागस होतो. परंतु, दुसऱ्या भागात खूप हुशारी दाखवत होतो आणि तेच काम करत नव्हते. आता बाबूराव गणपतराव आपटे नको. तोच तो पणाचा कंटाळा आला आहे," असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "सध्या हेरा फेरीच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे. पण जेव्हाही असं होतं तेव्हा एखाद्या पात्राला निरागसपणाची आवश्यकता असते, ती तिथे नव्हती… ती तिथे नव्हतीच. तिथेच चूक झाली. मात्र, सत्य हे आहे की मला आता या पात्रातून सुटका हवी आहे."

दरम्यान, २००० साली प्रियदर्शन यांनी 'हेरा फेरी' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात परेश रावलसोबत अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते.  हा चित्रपट कल्ट चित्रपटांच्या श्रेणीत गणला जातो. त्याचा दुसरा भाग ‘फिर हेरा फेरी’ नीरज वोहरा यांनी दिग्दर्शित केला होता.
 

Web Title: paresh rawal says he is sick and tired of his baburao image wants to get rid of it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.