परिणीती चोप्रा अन् राघव चड्डाने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 02:22 PM2023-08-28T14:22:00+5:302023-08-28T14:23:01+5:30

राघव आणि परिणीतीला ती एक चूक नडली...

Parineeti Chopra and Raghav Chadha visits Mahakaleshwar temple seen footwear on netizens trolled | परिणीती चोप्रा अन् राघव चड्डाने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

परिणीती चोप्रा अन् राघव चड्डाने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्डासोबत (Raghav Chadda) ती पुढील आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. दोघंही कॉलेजपासूनचे मित्र मात्र अनेक वर्षांनी एकत्र भेटल्यानंतर त्यांच्यात प्रेम फुललं. पुढील महिन्यात ते सात फेरे घेणार आहेत. नुकतंच दोघांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र त्यांना ट्रोल केलं आहे. 

नेमकं काय घडलं?

परिणीती आणि राघव चड्डा लग्नापूर्वीच देवदर्शन करत आहेत. नुकतंच त्यांना उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पाहिलं गेलं. त्यांच्या भोवती कडक सुरक्षा होती. यावेळी परिणीतीने अबोली रंगाची साडी परिधान केली होती तर राघव चड्डाने पिवळ्या रंगाची धोती आणि वरुन लाल रंगाचं उपरणं घेतलं होतं.  दोघांनी शंकराची पूजा केली. त्यांचा दर्शन घेतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला. मात्र व्हिडिओत बघितलं तर मंदिराच्या परिसरात दोघांनी पायात चप्पल घातली होती. यावरुन नेटकरी चांगलेच चिडले आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.  

परिणीती आणि राघवच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. 'चप्पल घालून मंदिरात जातात का?','मंदिराच्या आवारात चप्पल घालायची नसते, हा नियम सेलिब्रिटींना का नाही?' असा प्रश्नही एकाने उपस्थित केला. त्यांना ही चूक चांगलीच महागात पडली. 

Web Title: Parineeti Chopra and Raghav Chadha visits Mahakaleshwar temple seen footwear on netizens trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.