Parineeti Chopra B'day: इन्व्हेस्टमेंट बँकर होता होता Parineeti Chopra झाली अभिनेत्री, इंटरेस्टिंग आहे कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 10:53 AM2022-10-22T10:53:28+5:302022-10-22T10:57:34+5:30
परिणीती चोप्रा (Parineeti Chopra)सध्या तिच्या वेगवेगळ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तिनं मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
परिणीती चोप्रा (Parineeti Chopra)सध्या तिच्या वेगवेगळ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. परिणीतीला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला. काही काळ तिचे चित्रपट फारसे कमाल करू शकले नाहीत. आता पुन्हा एकदा परिणीती तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. परिणीती आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या चित्रपटातील एंट्री आणि करिअरबद्दल जाणून घेऊया.
परिणीती चोप्राचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. पंजाबी हिंदू कुटुंबात जन्मलेल्या परिणीतीचे वडील बिझनेसमन आहेत आणि आई गृहिणी आहे. प्रियांका चोप्रा ही तिच्या मोठ्या काकांची मुलगी आहे. परिणीतीचे सुरुवातीचे शिक्षण अंबाला येथेच झाले. परिणीती सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती हे पाहून तिच्या वडिलांनी वयाच्या १७ व्या वर्षी तिला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवले.
अभ्यासात हुशार असलेली परिणीती जेव्हा इंग्लंडला पोहोचली तेव्हा तिने मन लावून अभ्यास केला. तिनं मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. परिणीतीने बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्स केले. परिणीतीचे स्वप्न इन्व्हेस्टमेंट बँकर बनण्याचे होते. पण 2009 मध्ये आलेल्या रिसेशनमुळे भारतात परतावं लागलं. ती मुंबईत आली. मुंबईत आल्यावर ती यशराज फिल्म्सच्या मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये काम करु लागली.
परिणिती यशराज फिल्म्सच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. 'बँड बाजा बारात' चित्रपटादरम्यान ती खूप सक्रिय होती आणि त्यामुळेच ती सर्वांच्या नजरेत आली होती. परिणीती अभिनयात आणखी चांगली कामगिरी करू शकते, असे आदित्य चोप्राला वाटत होते. त्याने परिणीतीसोबत तीन चित्रपटांचा बाँड साइन करून घेतला आणि परिणीतीनं फिल्म इंडस्ट्रीत एंट्री केली.