परिणीती चोप्रासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी,या गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासारखं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 04:41 PM2018-08-27T16:41:48+5:302018-08-28T06:00:00+5:30

'नमस्ते इंग्लंड' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान फोटोग्राफर तिचे फोटो क्लिक करत होते. तेव्हा ती कंम्फर्टेबल नसल्याचे स्पष्ट दिसत होते.

Parineeti Chopra trolled for her "tight dress" at 'Namaste England' promotions | परिणीती चोप्रासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी,या गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासारखं

परिणीती चोप्रासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी,या गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासारखं

googlenewsNext

एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत. 'नमस्ते इंग्लंड' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान फोटोग्राफर तिचे फोटो क्लिक करत होते. तेव्हा ती कंम्फर्टेबल नसल्याचे स्पष्ट दिसत होते. तिचा ड्रेस खूप टाईट असल्याचे तिला जाणवत होते. दरम्यान ती अचानक वैतागतली आणि तिथुन निघून गेली.

त्या वेळी परिणीतीने परिधान केलेला ड्रेस ती वारंवार सावरताना दिसली. फोटोमध्ये अतिशय वैतागलेली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही तिच्या या फोटोंची खिल्ली उडवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा ट्रायल घेऊन देखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून जाते. ब-याचदा अभिनेत्री त्यांच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. अगदी त्याचप्रमाणे परिणीतीही या ड्रेसमुळे ट्रोल होत आहे. तिच्या या टाईट ड्रेसवर फोटोवर नेटीझन्स विचित्र कमेंटस देताना दिसतायेत.इतर अभिनेत्रींप्रमाणे वेगवेगळे डिझायनर ड्रेस परिधान करायची परिणीतीलाही पसंत आहे. मात्र पहिल्यांदाच हा डिझायनर ड्रेस परिणीतीसाठी डोकेदुखी ठरला. त्यामुळे संपूर्ण इव्हेंटमध्ये परिणीती वैतागलेलीच दिसली. 

अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी 'इश्कजादे' चित्रपटातून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली होती. या चित्रपटातील त्यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली होती आणि या जोडीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. या चित्रपटानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. अर्जुन व परिणीती विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित 'नमस्ते लंडन' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर अर्जुन आणि परिणीती दोघांनीही हे पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहे.
 

Web Title: Parineeti Chopra trolled for her "tight dress" at 'Namaste England' promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.