पॅरिस हिल्टन अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार! व्हाईट हाऊस ‘पिंक’ करणार !!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:18 PM2020-07-09T17:18:57+5:302020-07-09T17:21:06+5:30

Lets Make America Hot Again...चा दिला नारा

paris hilton announces president 2020 in us elections lets make america hot again | पॅरिस हिल्टन अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार! व्हाईट हाऊस ‘पिंक’ करणार !!

पॅरिस हिल्टन अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार! व्हाईट हाऊस ‘पिंक’ करणार !!

googlenewsNext
ठळक मुद्देपॅरिस हिल्टन ही सोशल मीडियावरचे तिचे बेल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असते. अभिनेत्री असण्यासोबतच ती मॉडेल, डिझाईनर व गायिका आहे.

यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. पण यावेळी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत डोनाल्ड ट्रम्प एकटे नाहीत. जो बिडेन हे तगडे उमेदवार आहेतच. शिवाय प्रसिद्ध रॅपर व सिंगर कान्ये वेस्ट हा सुद्धा ही निवडणूक लढणार आहे. आता हॉलिवूडची जगप्रसिद्ध मॉडेल पॅरिस हिल्टन हिने सुद्धा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. 5 जुलैला  पॅरिसने ती राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार असे जाहीर केले होते. केवळ इतकेच नाही तर आपल्या निवडणूक प्रचारासाठी तिने स्लोगनही तयार केले आहे. ‘मेक अमेरिका हॉट अगेन’ असे तिचे स्लोगन आहे.

आपल्या टिष्ट्वटमध्ये तिने अमेरिकन ध्वजासोबत ‘ पॅरिस फॉर प्रेसिडेंट’ असे लिहित पिंक कलरच्या स्कर्ट सूटमधील स्वत:चे पोस्टरही जारी केले. सोबत राष्ट्राध्यक्ष झाल्यास काय काय करणार, याचा प्लानही तिने जाहीर केला आहे. तूर्तास सोशल मीडियावर तिच्या या स्लोगनची आणि पोस्टरची जोरदार चर्चा आहे.

तर व्हाईट हाऊसला पिंक कलरमध्ये रंगवणार...
राष्ट्राध्यक्ष बनलीच तर मी अमेरिकन नागरिकांना केवळ अमेरिकन डिझायनर्सचे कपडे घालायला सांगणार. सोबत व्हाईट हाऊस पिंक कलरमध्ये रंगवणार, असे  पॅरिस हिल्टनने म्हटले आहे. तूर्तास तिच्या या घोषणा पाहून युजर्स तिची चांगलीच मजा घेत आहेत.

खरे की खोटे?
 पॅरिस हिल्टन खरोखर अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार की  कान्ये वेस्टची खिल्ली उडवणे हा तिचा उद्देश आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण एकमात्र खरे की, तिच्या या घोषणेने सोशल मीडियावरच्या तिच्या चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

पॅरिस हिल्टन ही सोशल मीडियावरचे तिचे बेल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असते. अभिनेत्री असण्यासोबतच ती मॉडेल, डिझाईनर व गायिका आहे.

Web Title: paris hilton announces president 2020 in us elections lets make america hot again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.