"आम्ही चुकलो, तुझ्यावर अत्याचार केले, पण... ", भाजपात गेलेल्या अभिनेत्याचा विनेश फोगाटला साष्टांग दंडवत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 09:57 AM2024-08-07T09:57:54+5:302024-08-07T10:00:12+5:30

Vinesh Phogat Paris Olympic 2024 : विनेश फोगाटनं फायनलमध्ये एन्ट्री घेत भारतासाठी आणखी एक मेडल पक्कं केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकरने कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी केलेल्या पोस्टने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

paris olympic 2024 marathi actor abhijeet kelkar shared post for wrestler vinesh phogat after she reach final | "आम्ही चुकलो, तुझ्यावर अत्याचार केले, पण... ", भाजपात गेलेल्या अभिनेत्याचा विनेश फोगाटला साष्टांग दंडवत!

"आम्ही चुकलो, तुझ्यावर अत्याचार केले, पण... ", भाजपात गेलेल्या अभिनेत्याचा विनेश फोगाटला साष्टांग दंडवत!

Paris Olympics 2024: भारताती महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) महिला कुस्तीच्या ५० किग्रँ वजनी गटात थेट फायनलमध्ये धडक देत इतिहास रचला आहे. मंगळवारी सेमीफायनलमध्ये क्यूबाची रेसलर युसनेइलिस गुजमैनला ५-० नं दारुण पराभव करत तिने थेट फायनलमधील आपलं स्थान निश्चित केलं. विनेश फोगाटनं फायनलमध्ये एन्ट्री घेत भारतासाठी आणखी एक मेडल पक्कं केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. सेलिब्रिटींनीही विनेश फोगाटला पाठिंबा देत तिच्यासाठी पोस्ट केल्या आहेत. 

मराठी अभिनेताअभिजीत केळकरने कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी केलेल्या पोस्टने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावरुन विनेशसाठी पोस्ट केली आहे. "आम्ही चुकलो...मानवनिर्मित देवदेवतांची पूजा करत राहिलो, तुझ्यातल्या स्त्रीत्वाला पायदळी तुडवलं, तुझ्यावर अत्याचार केले... पण तू हरली नाहीस. खरंतर तुझी माफी मागायचीही आमची लायकी नाही... तुझ्यातल्या स्त्रीशक्तीला साष्टांग दंडवत", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


गेल्यावर्षी भारताच्या कुस्तीपटूंनी कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा या कुस्तीपटूंवर लाठीचार्ज करण्यात आला होता. 

दरम्यान, आता विनेश बुधवारी(७ ऑगस्ट) सुवर्ण पदासाठी खेळणार आहे. ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे. विनेश फोगाटच्या फायनलमधील एन्ट्रीनं तिच्याकडे गोल्ड मेडल जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. विनेशचा आता अंतिम लढतीत अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी सामना होणार आहे, जिनं २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. विनेशच्या फायनलमधील एन्ट्रीमुळे भारताच्या सुवर्णपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

Web Title: paris olympic 2024 marathi actor abhijeet kelkar shared post for wrestler vinesh phogat after she reach final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.