व्यायामासाठी पार्टनरची साथ!
By Admin | Published: June 7, 2017 02:43 AM2017-06-07T02:43:32+5:302017-06-07T02:43:32+5:30
बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या फिटनेसविषयी नेहमीच जागरूक असतात.
-Satish Dongare
बॉलिवूड सेलेब्स त्यांच्या फिटनेसविषयी नेहमीच जागरूक असतात. कुठल्याही परिस्थितीत ते आपल्या फिगरविषयी तडजोड करण्यास तयार नसतात. त्यामुळेच लग्नानंतरही आपल्या जोडीदारासोबत ते जिममध्ये जाणे पसंत करतात. पार्टी, डेट्स, डिनर, इवेंट्स येथे एकत्र दिसणारे हे कपल्स जेव्हा जिममध्ये जाताना स्पॉट होतात, तेव्हा सर्वसामान्यांनाही त्यांचे कुतूहल वाटते. आज आम्ही अशाच पाच कपल्सविषयी माहिती देणार आहोत, जे जिममध्ये एकत्र जाणे पसंत करतात. या कपल्सची आपल्या फिटनेसप्रती असलेली जागरूकता बघून तुम्हीही आपल्या जीवनात व्यायामाला प्राधान्य द्याल हे नक्की...
सैफ अली खान आणि
करिना कपूर-खान
काही दिवसांपूर्वीच अमृता अरोराने तिच्या सोशल अकाउंटवर काही व्हिडीओज शेअर केले होते. ज्यामध्ये ती करिना कपूर-खान हिच्याबरोबर वर्कआऊट करताना दिसत होती. प्रेग्नसीनंतर करिनाचे वजन चांगलेच वाढले होते. तिला कुठल्याही परिस्थितीत पूर्वीसारखाच स्लिम फिगर मिळवायचा होता. त्यामुळे ती नियमितपणे जिममध्ये जात आहे. योगा आणि जीम हे तिच्या दिनक्रमातील मुख्य भाग बनले आहेत. जीमसाठी तिला बऱ्याचदा अमृता आणि मलाइका अरोरा यांची कंपनी मिळत आहे. त्याचबरोबर पती सैफबरोबरही ती वर्कआऊट करताना बघावयास मिळाली आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा हे दोघे जिमला एकत्र जातात.
करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू
बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून ओळखले जाणारे करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू यांचे व्यायामाप्रती नेहमीच आकर्षण राहिले आहे. बॉक्सिंगची आवड असलेली बिपाशा लग्नानंतर व्यायामापासून दूर गेली नाही. उलट पती करणसिंग ग्रोवरबरोबर ती नित्यनियमाने जिमला जात असते. दोघांच्या जिमचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे. आपल्या चाहत्यांना व्यायामाचे महत्त्व पटावे, याकरिताच ते जिमचे फोटो सोशल अकाउंट शेअर करीत असल्याचे बिपाशाने एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा एकत्र जिममध्ये जात असतानाचे फोटोज् मीडियात दाखविले जात आहेत. वास्तविक मीराला जिममध्ये येण्यास शाहिदनेच प्रोत्साहित केले. प्रेगनन्सीनंतर मीराचे वजन वाढले होते. सध्या हे दोघेही नित्यनियमाने वर्कआऊटसाठी एकत्र जिममध्ये जात असतात.
सोहा अली खान आणि कुणाल खेमू
मोठा भाऊ आणि वहिनी सैफ-करिनाप्रमाणेच सोहा अली खान आणि कुणाल खेमू हेदेखील फिटनेसप्रती जागरूक आहेत. या दोघांना बऱ्याचदा एकत्र जिमला जाताना बघण्यात आले आहे. सध्या सोहा प्रेग्नंट असून, कुणाल तिला लाइट वर्कआऊट आणि योगाच्या टिप्स देत आहे. हे दोघेही फिटनेसप्रती विशेष जागरूक आहेत.
अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार हा फिटनेसप्रती प्रचंड जागरूक आहे. कितीही व्यस्त शेड्यूल्ड असले, तरी अक्षय वर्कआऊट करण्यास तो वेळ काढतोच. यासाठी अक्षयला पत्नी टिवंकलची नेहमीच कंपनी मिळत असते. त्यामुळे आजही हे कपल फिट दिसते. वास्तविक अक्षयची वर्कआऊट करण्याची स्टाइल जरा वेगळी आहे. त्यामुळे टिवंकल त्याला यासाठी कंपनी देऊ शकत नाही. मात्र, योगा सेशनमध्ये हे दोघेही एकत्र योगा करतात. गेल्या योगा डे निमित्त अक्षयने सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये हे दोघे फिटनेसप्रती किती कॉन्शियस आहेत हे दिसून येते.