हृतिकची फ्रेंड्ससोबत पार्टी!

By Admin | Published: April 28, 2016 02:56 AM2016-04-28T02:56:18+5:302016-04-28T02:56:18+5:30

हृतिक रोशन-कंगणा राणावत यांच्या वादामुळे बॉलीवूडला एक वेगळेच वळण मिळाले आहे

Party with Hrithik's Friends | हृतिकची फ्रेंड्ससोबत पार्टी!

हृतिकची फ्रेंड्ससोबत पार्टी!

googlenewsNext

हृतिक रोशन-कंगणा राणावत यांच्या वादामुळे बॉलीवूडला एक वेगळेच वळण मिळाले आहे, तरी बॉलीवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन हा स्वत:ला एकदम कूल, रिलॅक्स ठेवू पाहत आहे. तो नुकताच टर्कीतील अंतल्या या ठिकाणी एका मित्राच्या लग्नासाठी गेला आहे. तिथे तो नेहा धुपिया, जरीन खान आणि त्याची पत्नी सुझानचा भाऊ जायेद खान यांच्यासोबत दिसत आहे. सुझानही त्याच ट्रीपवर गेली होती, पण ती हृतिक तिथे येण्याअगोदरच फॅमिलीसोबत बाहेर पडली. जरी सुझान तिथून काही कारणामुळे निघाली असली, तरी जायेद खान मात्र, हृतिकसोबत तिथे पार्टीसाठी थांबला होता. हृतिकने फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केला असून, त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘अंतल्या नाइट्स! लाइफ इज अ‍ॅन अ‍ॅडव्हेंचर! मेकिंग इच एक्स्पिरियन्स काउंट...लाइव्ह.’

Web Title: Party with Hrithik's Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.