Parveen Babi Death Anniversary: परवीन बाबीचा मृतदेह तीन दिवस घरात पडून होता, तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 08:00 AM2023-01-20T08:00:00+5:302023-01-20T08:00:01+5:30

Parveen Babi Death Anniversary: बॉलिवूडची एकेकाळची अतिशय मादक, बिनधास्त अभिनेत्री. पडद्यावर ती इतकी सुंदर दिसायची की चाहते तिच्या प्रेमात पडायचे. तिने प्रचंड यश मिळवलं. लोकप्रियता मिळवली. पण तिचा शेवट इतका दुर्दैवी झाला की, नियती अशी का वागते असा प्रश्न पडावा...

Parveen Babi Death Anniversary: The Will Was Revealed 11 Years After The Death Of Parveen Babi | Parveen Babi Death Anniversary: परवीन बाबीचा मृतदेह तीन दिवस घरात पडून होता, तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचं काय झालं?

Parveen Babi Death Anniversary: परवीन बाबीचा मृतदेह तीन दिवस घरात पडून होता, तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचं काय झालं?

googlenewsNext

Parveen Babi Death Anniversary:  परवीन बाबी...!बॉलिवूडची एकेकाळची अतिशय मादक, बिनधास्त अभिनेत्री. पडद्यावर ती इतकी सुंदर दिसायची की चाहते तिच्या प्रेमात पडायचे. तिने प्रचंड यश मिळवलं. लोकप्रियता मिळवली. पण तिचा शेवट इतका दुर्दैवी झाला की, नियती अशी का वागते असा प्रश्न पडावा. आज परवीन बाबी (Parveen Babi) आपल्यात नाही. 2005 साली आजच्या दिवशी म्हणजे 20 जानेवारीला ती हे जग सोडून गेली.  यशाच्या शिखरावर असतानाच तिला पॅरानाइड स्कित्जोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला. हा आजार इतका बळावला की, पुढे परवीन परवीन राहिली नाही.

1983 मध्ये परवीन बॉबी सगळे सोडून अध्यात्म गुरू यू. जी. कृष्णमूर्तींसोबत परदेशात अध्यात्माच्या मार्गावर काय गेली... न्यूयॉर्क एअरपोर्टवर कागदपत्रे न दाखवल्याने तिला तुरुंगाची हवा काय खावी लागली... तेव्हाच तिला मानसिक आजार असल्याचं बोललं जाऊ लागलं. अनेक वर्षे ती परदेशात राहिली आणि अचानक 1989 मध्ये ती पुन्हा मुंबईला आली. ती मुंबईत परतली तेव्हा हीच ती असा प्रश्न अनेकांना पडला होता. तिचं वजन वाढलं होते. पैसा, प्रसिद्धी सगळं असताना एकटेपणामुळे तिच्या मनावरही परिणाम झाला होता. आपल्याला कोणी तरी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे भास तिला होऊ लागले होते...

या काळात ती पुरती एकटी पडली. इतकी की, मृत्यू झाल्यानंतर तीन दिवस तिचा मृतदेह घरात पडून होता. दरवाज्याबाहेर ठेवलेलं ब्रेड- दूध तीन दिवसांपासून उचललं गेलं नाही,हे पाहून लोकांनी पोलिसांना कळवलं, तेव्हा कुठे तिच्या मृत्यूबद्दल कळलं. 20 जानेवारी 2005 रोजी परवीन तिच्या जुहूतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती.

परवीनची संपत्ती...
परवीनच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचं काय झालं? तर परवीनच्या मृत्यूपश्चात 11 वर्ष तिच्या संपत्तीचा वाद कोर्टात चालला. परवीनच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. या वादावर 11 वर्षानंतर पडदा पडला होता. न्यायालयानं परवीनच्या मृत्यूपत्राला मंजुरी दिली. कोर्टाच्या आदेशानुसार, परवीनच्या संपत्तीचा 80 टक्के भाग गरजू महिला आणि मुलांच्या मदतीकरता देण्यात आला आणि 20 टक्के भाग तिच्या मामाला मिळाला.

परवीनच्या नावे जुहूमधला समुद्रकिना-याजवळचा चार बेडरुमचा फ्लॅट, जुनागढ इथली हवेली, सोने, बँकेत असलेले 20 लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट आणि अन्य पैसे इतकी संपत्ती होती. परवीनच्या मृत्यूपत्रानुसार, तिच्या 80 टक्के संपत्तीचा वापर करून एक ट्रस्ट स्थापन केला गेला. याद्वारे गरजू महिला आणि जुनागढमधील बाबी समाजातल्या मुलांना मदत करण्यात आली. परवीनचे मामा मुरादखान हे तिच्या सर्वात जवळचे होते. तिच्या संपत्तीतला 20 टक्के हिस्सा त्यांनाच मिळाला आहे. त्यांच्या ट्रस्टच्या निधीतला 10 टक्के भाग अहमदाबादच्या सेंट झेवियर्स कॉलेजला दिला गेला. मॉडेलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी परवीनने याच कॉलेजमधून इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती.

Web Title: Parveen Babi Death Anniversary: The Will Was Revealed 11 Years After The Death Of Parveen Babi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.