Pathaan : 'पठाण' ने रिलीजपूर्वीच ठोकले अर्धशतक,ॲडव्हान्स बुकिंगने मोडला 'वॉर'चा रेकॉर्ड!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:52 PM2023-01-24T13:52:16+5:302023-01-24T13:54:25+5:30
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट बुधवारी रिलीज होत आहे. या चित्रपटाची चर्चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सुरू आहे. या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच धमाकेदार अॅक्शन अवतारात दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा पठाण (Pathaan) चित्रपट बुधवारी रिलीज होत आहे. या चित्रपटाची चर्चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सुरू आहे. या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच धमाकेदार अॅक्शन अवतारात दिसणार आहे. 'पठाण'ची दोन गाणी, टीझर आणि ट्रेलरला खूप पसंती मिळाली आहे. 'पठाण' बॉक्स ऑफिसवर कशी जबरदस्त कमाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या बातम्यांवरून 'पठाण'ची क्रेझ चांगलीच सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
'पठाण'च्या ओपनिंग वीकेंडसाठी अॅडव्हान्स बुकींग जोरदार सुरू आहे. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला एक अप्रतिम रेकॉर्ड बनवला आहे. आगाऊ बुकिंगच्या बाबतीत, 'पठाण'ने गेल्या वर्षीचा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट 'ब्रह्मास्त्र'चा विक्रम मोडला आहे आणि आता KGF 2 सारख्या मोठ्या चित्रपटांना आव्हान देत आहे.
Vanita Kharat : 'हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट, आधी KISS आणि आता...
'पठाण'च्या पहिल्या वीकेंडसाठी अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनने 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आकडेवारीनुसार, 'पठाण'ने पहिल्याच दिवशी आगाऊ बुकिंगमधून 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे. बुधवारी चित्रपटाने बुकिंगमधून 24 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर गुरुवारसाठी हा आकडा 13.38 कोटी आहे आणि येत्या काही दिवसांसाठी तो 13.92 कोटी आहे.
'पठाण'ची 8 लाख तिकिटे पहिल्या दिवसासाठीच अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. यापैकी 4.19 लाख तिकिटे पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन नॅशनल सिनेमा चेनमध्येच आरक्षित झाली आहेत. नॅशनल चेन्समध्ये कोणत्याही बॉलीवूड चित्रपटाचे हे सर्वात मोठे बुकिंग आहे. याआधी हा विक्रम हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर' चित्रपटाच्या नावावर होता, ज्याने पहिल्याच दिवशी राष्ट्रीय साखळीत 4.10 लाख रुपयांची विक्री केली होती.
ओपनिंग वीकेंडसाठी अॅडव्हान्स कलेक्शनच्या बाबतीत 'पठाण' हा बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने 5 दिवसांच्या दीर्घ विकेंडसाठी आधीच 50 कोटींहून जास्त कमाई केली आहे. याआधी हा विक्रम सिद्धार्थ आनंदच्या 'वॉर' चित्रपटाच्या नावावर होता, या चित्रपटाने 2019 मध्ये सुरुवातीच्या वीकेंडला सुमारे 42 कोटींचा आगाऊ कमाई केली होती.
सुरुवातीपासून 'पठाण'चे बुकिंग झपाट्याने वाढत आहे, सोमवारपासून पुन्हा मागणीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी नॅशनल सिनेमा चेन्समध्ये 'पठाण'च्या 4.19 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. हा आकडा बॉलीवूड चित्रपटांच्या बाबतीत अव्वल असला तरी हिंदी चित्रपटांच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदीमध्ये पहिल्याच दिवशी राष्ट्रीय साखळीत सर्वाधिक आगाऊ तिकीट विकण्याचा विक्रम 'बाहुबली 2'च्या नावावर आहे. प्रभासच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय साखळीतच 6.50 लाख तिकिटे विकली गेली. तर KGF 2 साठी हा आकडा 5.15 लाख होता. 'पठाण'ची आगाऊ बुकिंग मंगळवारी संध्याकाळपर्यंत KGF 2 चा आकडा सहज पार करू शकते.