Pathaan Movie Leak : किंग खानला पायरसीचा फटका, पठाण ऑनलाईन लीक, तरी सिनेमा आहे फायद्यात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 08:45 AM2023-01-25T08:45:09+5:302023-01-25T08:47:41+5:30

एकीकडे पठाणचे अॅडव्हान्स बुकिंगच दणक्यात झाले असतानाच सिनेमा रिलीज आधीच ऑनलाईन लीक झाल्याचं समोर आलं आहे.

pathaan full movie leak online before its release in hd format still movie is in profit | Pathaan Movie Leak : किंग खानला पायरसीचा फटका, पठाण ऑनलाईन लीक, तरी सिनेमा आहे फायद्यात ?

Pathaan Movie Leak : किंग खानला पायरसीचा फटका, पठाण ऑनलाईन लीक, तरी सिनेमा आहे फायद्यात ?

googlenewsNext

Pathaan Movie Leak : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. तब्बल ५२०० स्क्रीन्स पठाणला मिळाल्या आहेत. एकीकडे पठाणचे अॅडव्हान्स बुकिंगच दणक्यात झाले असतानाच सिनेमा रिलीज आधीच ऑनलाईन लीक झाल्याचं समोर आलं आहे. याआधीही अनेक चित्रपट रिलीजआधीच ऑनलाईन लीक होतात. त्यात आता 'पठाण' ला ही फटका बसला आहे. 

झूम टीव्हीच्या रिपोर्टनुसार पठाण सिनेमा तमिल रॉकर्स फिल्मीजिला, mp4 मूवीज, आणि वेगामूवीज अशा काही साईट्सवर लीक झाल्याचं समोर आलं आहे.या सर्व वेबसाईट्सवर सिनेमा HD प्रिंटमध्ये उपलब्ध आहे. पायरसीमुळे फिल्ममेकर्सला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवर होतो. ऑनलाईन HD प्रिंट मिळत असेल तर थिएटरमध्ये जाण्याची गरजच पडत नाही.

'पठाण' च्या कमाईवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रेड एक्सपर्टस देखील अनेकदा पायरसीच्या धोक्याचा इशारा देतात. तिकिटांची विक्री कमी होते. याआधीही ब्रम्हास्त्र, RRR, पुष्पा, भूत पार्ट वन, शुभ मंगल जादा सावधान आणि दृश्यम २ ला पायरसीचा फटका बसला आहे.

पठाण आधीच आहे फायद्यात 

तसं बघायला गेलं तर पठाणला याची काळजी करण्याची गरज नाही कारण सिनेमा आधीच फायद्यात आहे. रिलीज आधीच सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगने रेकॉर्ड केले आहे. रिलीजआधीच सिनेमाने ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. १३ लाखांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. सिनेमा जोरदार कमाई करेल असंच चित्र दिसून येतंय.

Web Title: pathaan full movie leak online before its release in hd format still movie is in profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.