Pathaan Movie : पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तरी संघटनांचा विरोध कायम, मुंबईत पोस्टर्स फाडून निषेध व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 09:00 AM2023-01-30T09:00:45+5:302023-01-30T09:02:11+5:30

एकीकडे शाहरुखचा (Shahrukh Khan) हा चित्रपट तुफान कामगिरी करत असतानाच दुसरीकडे विरोधही कायम आहे.

pathaan movie hindu sanghatan breaks posters in a theatre in bhayandar mumbai | Pathaan Movie : पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तरी संघटनांचा विरोध कायम, मुंबईत पोस्टर्स फाडून निषेध व्यक्त

Pathaan Movie : पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तरी संघटनांचा विरोध कायम, मुंबईत पोस्टर्स फाडून निषेध व्यक्त

googlenewsNext

Pathaan Movie :  बॉक्सऑफिसवर पठाण सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. बॉयकॉट ट्रेंडचा पठाणवर काहीच परिणाम झालेला नसून उलट दोनच दिवसात सिनेमाने २०० कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. एकीकडे शाहरुखचा (Shahrukh Khan) हा चित्रपट तुफान कामगिरी करत असतानाच दुसरीकडे विरोधही कायम आहे असंच दिसतंय. 

काल संध्याकाळी मुंबईतील भाईंदर पश्चिमच्या मॅक्सेस मॉलमध्ये सुरु असलेला पठाणचा शो बंद पाडण्यात प्रयत्न केला. हिंदू संघटनांनी डिजिटल पोस्टर फाडत विरोध केला. लाठ्या घेऊन आलेल्या या कार्यकर्त्यांनी पोस्टर फाडले. काल रविवारी संध्याकाळी ४ वाजता ही घटना घडली. पोस्टर फाडणाऱ्या ९ जणांना भाईंदर पोलिसांनी ताब्यात घेतले. 

इतरही राज्यात विरोध कायम

पठाण सिनेमाला केवळ मुंबईतच नाही तर इतरही राज्यात विरोध नोंदवला जात आहे. पटना पासून ते आसाम पर्यंत थिएटरमधील पोस्टर जाळण्यात आले. पटनाच्या गांधी मैदानजवळील मोना सिनेमा हॉल समोरील श्रीराम सेना संघटनाने हंगामा केला 

पठाणला विरोधाचा किंवा बॉयकॉट ट्रेंडचा काहीच परिणाम झालेला नाही. उलट चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. भारतात आतापर्यंत सिनेमाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे तर जगभरात पठाणने ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्याच आठवड्यात ही कामगिरी बघून सिनेमा घवघवीत यश मिळवणार असंच दिसतंय. सिनेमाला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहता शाहरुख खान लवकरच माध्यमांसमोर येणार अशी चर्चा आहे.

Web Title: pathaan movie hindu sanghatan breaks posters in a theatre in bhayandar mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.