Pathaan : पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ? कसं ते बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 03:55 PM2023-01-19T15:55:13+5:302023-01-19T15:58:06+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची उत्सुकता आता खूपच ताणली आहे.

pathaan movie tickets selling at just 55 rs only there is only one condition to be fulfilled | Pathaan : पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ? कसं ते बघा

Pathaan : पठाणचा रिलीजआधीच धुमाकूळ, फक्त ५५ रुपयांना मिळणार 'पठाण' चे तिकीट ? कसं ते बघा

googlenewsNext

Pathaan : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण' सिनेमाची उत्सुकता आता खूपच ताणली आहे. सिनेमा बघण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. प्रदर्शानाआधीच 'पठाण' ची तिकीटं बुक व्हायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर तिकिटांची किंमत २७०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अव्वाच्या सव्वा किंमतीत तिकीटं विकली जात असतानाच दुसरीकडे चित्र वेगळंच काही. असेही काही ठिकाणं आहेत जिथे तिकीटांची किंमत फक्त ५५ रुपये  ते ८५ रुपये इतकेच असणार आहे. पण त्यासाठी काय अट आहे बघा.

२५ जानेवारी रोजी पठाण चित्रपटगृहात रिलीज होत आहे. हाच सिनेमा स्वस्तात पाहण्याची संधी काही जणांना मिळू शकते. 'पठाण'च्या तेलुगू डबिंग व्हर्जनची तिकीटं फक्त ५५ रुपयांना विकली जात आहेत. तसेच यासाठी एक अटही आहे. तुम्ही हैदराबादचे रहिवासी असाल आणि तेलुगू डबिंग पाहण्याची तयारी असेल तर मग तुम्हाला अवघ्या ५५ रुपयांमध्ये तिकीटं मिळतील. हैदराबाद मधील देवी 70MM 4K Laser आणि RTC X Roads वरील डॉल्बी अटमॉसमध्ये ५५ रुपयांना तिकीटं मिळणार आहेत. 

फक्त हैदराबादच नाही तर दिल्लीतही ही खास ऑफर आहे. एकीकडे दिल्लीत पठाण च्या तिकीटांची किंमत  २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहेत तेच दुसरीकडे दिल्लीतील करोल बाग लिबर्टी सिनेमामध्ये ८५ रुपयांना २D नॉन आयमॅक्स व्हर्जनमध्ये पठाण दाखवण्यात येणार आहे.

'पठाण'चे वाढते बुकिंग पाहता पहिल्याच दिवशी सिनेमा धुमाकूळ घालणार असंच चित्र दिसतंय.  सिनेमाचं प्रिबुकिंगच १ कोटी पर्यंत पोहोचलं आहे. शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: pathaan movie tickets selling at just 55 rs only there is only one condition to be fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.