ट्विंकल खन्नाचा हा फोटो पाहिलातं? हा टोला मोदींना तर नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 01:26 PM2019-05-20T13:26:10+5:302019-05-20T13:27:14+5:30
होय, ट्विंकलने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती ध्यान मुद्रेत बसलेली दिसतेय. हा फोटो आणि त्याचे कॅप्शन वाचून लोकांनी याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला आहे.
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या बेधडक आणि परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहते. सध्याही एका अशाच करामतीमुळे ती चर्चत आली आहे. होय, ट्विंकलने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती ध्यान मुद्रेत बसलेली दिसतेय. या फोटोला ट्विंकलने दिलेले कॅप्शन चांगलेच मजेशीर आहे. विशेष म्हणजे, हा फोटो आणि त्याचे कॅप्शन वाचून लोकांनी याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला आहे. आता कसा, ते सांगायची गरज नसावी.
‘इतके सारे आध्यात्मिक फोटो पाहिल्यानंतर मी सुद्धा मेडिटेशन फोटोग्राफी, पोजेस अॅण्ड अँगलवर कार्यशाळा सुरु करतेय. येत्या दिवसांत वेडिंग फोटोग्राफीनंतर या सर्वात मोठी मागणी असणार आहे, याची मला जाणीव आहे. तेव्हा या आणि नाव नोंदवा,’ असे ट्विंकलने हा फोटो शेअर करताना लिहिले.
Folks please sign up-After seeing so many spiritual images in the last few days-I am now starting a series of workshops ‘Meditation Photography-Poses and Angles’ I have a feeling after wedding photography this is going to be the next big thing :) #AJokeADayMayKeepJillSanepic.twitter.com/uYP4FpQvYX
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) May 20, 2019
लोकांनी ट्विंकलचा हा फोटो पाहिला आणि त्याचा थेट संबंध मोदींच्या केदारनाथ गुहेतील ध्यानसाधनेशी जोडला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मोदींनी केदारनाथ येथील या गुहेत भगवी वस्त्रे धारण करत रात्रभर ध्यानसाधना केली होती. त्यांच्या या ध्यानसाधनेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अनेकांच्या मते, ट्विंकलने ‘इशारों इशारों’मध्ये मोदींच्या या ध्यानसाधनेची टर उडवली आहे. आपल्या सेन्स आॅफ ह्युमरसाठी ओळखल्या जाणाºया ट्विंकलचा हा अंदाज अनेकांना भावला. पण त्याचवेळी अनेक मोदी समर्थकांनी यावरून तिला ट्रोल करणे सुरु केले. एका युजरने अक्षय कुमारला टॅग करत, थेट ट्विंकलवर निशाणा साधला. ‘अक्षय, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण तुझी बायको मात्र अनेकदा इरिटेड करते,’ असे या युजरने लिहिले.
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने मोदींची मुलाखत घेतली होती. सोशल मीडियावर सुरु असलेल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देता का? असा प्रश्न अक्कीने मोदींना विचारला होता. यावर मोदींनी चक्क अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाचा उल्लेख केला होता. ‘होय, मी सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून असतो. मला यामुळे अनेक प्रकारची माहिती मिळते. मी तुमचे ट्विट्सही पाहतो,तसेच ट्विंकल खन्नाजींचेही ट्विट्स पाहतो. त्या माझ्यावर इतका राग काढतात की, कधी कधी मला वाटतं की, माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदव असावी. त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो आणि त्यामुळे तुम्हाला शांतता लाभते. एकप्रकारे यामाध्यमातून काही होईना, मी तुमच्या कामी येतो,’ असे मोदी हसत हसत म्हणाले होते.