दीपिकाने शेअर केला लहानपणीचा फोटो
By Admin | Published: April 6, 2017 06:43 PM2017-04-06T18:43:17+5:302017-04-06T19:21:28+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या बहिणीसोबतचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 06 - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या बहिणीसोबतचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला असून यामध्ये ती आणि तिची बहीण अनिशा एका गार्डनमध्ये बसलेली आहे. तसेच, दोघींचाही हेअरकट असल्यामुळे फोटोत त्या सुंदर दिसत आहेत.
बॉलिवूडमध्ये दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर यश प्राप्त केले आहे. "ओम शांती ओम" या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर दीपिकाने मागे वळून पाहिलेच नाही. विशेष म्हणजे तिने हॉलिवूडमध्ये सुद्धा एंट्री केली आहे. हॉलिवूड अॅक्शन स्टार विन डिजेल याच्यासोबत "ट्रिपल एक्स : द रिर्टन ऑफ झेंडर केज" या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी दीपिका आपल्या बहिणीला बॉलिवूडमध्ये येण्यास मदत करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र तिची बहिण अनिशा हिनेच एका मुलाखतीच्या वेळी तिने सांगितले की, मला फक्त गोल्फ खेळण्याची आवड आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.
दीपिका सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.