South Movies in 2023 : साऊथचा धमाका! नव्या वर्षात बॉलिवूडला ‘फाईट’ देण्यासाठी येत आहेत ‘हे’ 10 बिग बजेट सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 02:36 PM2022-12-30T14:36:55+5:302022-12-30T14:51:54+5:30

South Movies in 2023 : साऊथचे एकापेक्षा एक दमदार बिग बजेट सिनेमे नव्या वर्षांत रिलीज होत आहेत. त्यावर एक नजर..

2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी फार चांगलं नव्हतं. या वर्षात बहुतांश बॉलिवूडचे सिनेमे दणकून आपटले. मात्र नव्या वर्षाकडून बॉलिवूडला मोठ्या अपेक्षा आहेत. पण नव्या वर्षातही साऊथ इंडस्ट्री बॉलिवूडला तगडं आव्हान देणार आहे. साऊथचे एकापेक्षा एक दमदार बिग बजेट सिनेमे नव्या वर्षांत रिलीज होत आहेत. त्यावर एक नजर..

‘वरिसु’ हा एक अ‍ॅक्शन ड्राम आहे. थलपती विजय आणि रश्मिका मंदानाचा हा सिनेमा नव्या वर्षात 12 जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमाचा बजेट 200 कोटी आहे.

मेगास्टार चिरंजीवी, रवी तेजा, श्रुती हासन अशी स्टार कास्ट असलेला ‘वाल्टेअर वीरय्या’ हा सिनेमा जानेवारी 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. के. एस. रविन्द्र यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या साऊथ सिनेमाचा बजेट 140 कोटी रूपये आहे.

सुपरस्टार अजित कुमारचा ‘थुनिवू’ हा साऊथ सिनेमाही 12 जानेवारी 2023 मध्ये रिलीज होतोय. या सिनेमाचा बजेट 160 कोटी रूपये आहे.

मार्च 2023 मध्ये पवन कल्याण, निधी अग्रवाल, अर्जुन रामपाल, जॅकलिन फर्नांडिस अशी स्टारकास्ट असलेला ‘हरि हरा वीरा मल्लू’ हा साऊथचा सिनेमा रिलीज होतोय. याचा बजेट 150 कोटी रूपये आहे.

रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला ‘जेलर’ हा सिनेमा एप्रिल 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात ऐश्वर्या राय असल्याची चर्चा आहे. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 175 कोटींचा हा सिनेमा नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.

मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’चा पहिला भाग अलीकडेच रिलीज झाला होता. ऐश्वर्या राय, विक्रम,तृषा, शोभिता धुलिपाला अशी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात ‘पोन्नियन सेल्वन’ 28 एप्रिल 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ या सिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता या सिनेमाचा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा 2’ नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 350 कोटी बजेट असलेला हा सिनेमा जुलै-सप्टेंबर 2023 च्या दरम्यान रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

प्रभासचा बहुप्रतिक्षीत ‘सालार’ या सिनेमाचं बजेट आहे 200 कोटी. पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रभासचा हा सिनेमा सप्टेंबर 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

चियान विक्रम, मालविका मोहन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तंगलान’ हा साऊथचा बिग बजेट सिनेमाही नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचा बजेट 200 कोटी रूपये आहे.

कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेला ‘इंडियन 2’ हा 1996 साली रिलीज झालेल्या ‘इंडियन’चा सीक्वल आहे. 217 मध्ये ‘इंडियन 2’ची घोषणा झाली होती. पण कोरोना महामारीमुळे तो लांबला. अखेर 2023 मध्ये हा सिनेमा रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.या सिनेमाचा बजेट 200 कोटी आहे.