Amitabh Bachchan 80th Birthday: अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 05:15 PM2022-10-11T17:15:55+5:302022-10-11T17:43:50+5:30

11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या अमिताभ यांनी 1969 मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बॉलिवूडचे शेहनशहा, बिग बी अमिताभ बच्चन आज आपला ८०वा वाढदिवस साजरा करतायेत.

कुणी त्यांना ‘अँग्री यंग मॅन’, कुणी ‘सुपरमॅन ऑफ द सेंच्युरी’, कुणी ‘बिग बी’ तर कुणी ‘शहेनशह’ म्हणतात. बिग बी सध्या वयाच्या तिसऱ्या इनिंगमध्ये आहेत. परंतु आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.

आजही ते चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. बॉलिवूडमध्ये 7 नोव्हेंबर 1969 रोजी पदार्पण केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

तरुण, वृद्ध, माहिला, पुरुष सर्व वर्गातील त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले तरी ते थांबले नाही.

11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या अमिताभ यांनी 1969 मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

पण त्यांना खरी ओळख 973 मध्ये आलेल्या 'जंजीर' चित्रपटातील पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर 'दीवार' आणि 'शोले' सारख्या चित्रपटांनी त्यांना एक उत्तम अभिनेता सिद्ध केलं. यानंतरचा इतिहास सगळ्यांचा माहिती आहे.