Kabhi Khushi Kabhie Gham सिनेमातली छोटी करिना आठवतेय का ? आता दिसते बेबोपेक्षाही सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 04:10 PM2021-12-18T16:10:47+5:302021-12-18T16:19:07+5:30

करण जोहर(karan Johar) दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम'(Kabhi Khushi Kabhie Gham) हा बॉलिवूडमधील हिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाला प्रदर्शित होवून 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. २००१ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

आजही सिनेमा टीव्हीवर लागला तर त्याच आवडीने रसिकही हा सिनेमा पाहतात.

या सिनेमात अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, शाहरुख खान आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या.

सिनेमात छोटी करिना साकारली होती मालविका राजने.

K3G मध्ये मालविका काजोलची छोटी बहिण आणि बेबोच्या बालपणीची भूमिकेत झळकली होती.

मालविकाने नुकतेच सिनेमाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

करीना कपूरच्या बालपणीची व्यक्तिरेखा साकारत तिनं रसिकांवर मोहिनी घातली होती.

छोटी करिना म्हणजेच मालविका आता मोठी झाली आहे आणि खूपच सुंदर दिसते.

बालपणी जेवढी क्यूट दिसायची तेवढीच ग्लॅमरस मालविका या फोटोंमध्ये दिसत आहे.

मालविका सध्या एक यशस्वी मॉडेल आहे.

मालविका जवळपास तिच्या सर्व शोचे फोटो इन्स्टाग्रावर शेयर करत असते.