पुन्हा एक नवी सुरुवात! रिसेप्शनसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे नटले सुरुची-पियुष By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:47 PM 2023-12-07T13:47:59+5:30 2023-12-07T14:03:44+5:30
Suruchi Adarkar - Piyush Ranade's reception look : 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुरूची अडारकर हिने ६ डिसेंबर, २०२२ रोजी अभिनेता पियुष रानडेसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुरूची अडारकर हिने ६ डिसेंबर, २०२२ रोजी अभिनेता पियुष रानडेसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे.
सुरूची अडारकर हिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी चाहत्यांना दिली. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठी कलाविश्वातील कलाकारांनीदेखील कमेंट्स करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
सुरुची आणि पियुष यांनी लग्नात पारंपारिक लूक केला होता. यावेळी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर पियुषने सुरुचीच्या लूकला साजेसा असा पांढऱ्या रंगाचा दाक्षिणात्य पद्धतीचा लूक केला होता.
सुरुची-पियुषच्या लग्नातील फोटोमध्ये पियुष तिला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. या फोटोतील सुरूचीच्या मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
लग्नाच्या फोटोनंतर सुरूचीने रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत. यात पियुष-सुरुची यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. तर पियुषने काळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला होता आणि सुरुचीने अबोली रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
रिसेप्शनच्या फोटोत सुरूची आणि पियुष दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
पियुष-सुरूची ‘स्ट्रॉबेरी’ या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यानंतर ‘अंजली’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. नुकत्याच प्रदर्शित होऊन गेलेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटात शेवटची सुरूची दिसली होती तर पियुष सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत काम करतो आहे.