आमिर खानची गर्लफ्रेंड गौरीचा फोटो आला समोर, ६ वर्षाच्या मुलाची आहे आई, दिसते खूप सुंदर
By तेजल गावडे | Updated: March 14, 2025 11:11 IST2025-03-14T11:04:39+5:302025-03-14T11:11:10+5:30
Aamir Khan's girlfriend: आमिर खानच्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्प्रेट आहे. नुकतेच तिचे फोटो समोर आले आहेत.

अभिनेता आमिर खान आज १४ मार्च रोजी त्याचा ६०वा वाढदिवस साजरा करतो आहे. खरेतर त्याने त्याच्या प्री बर्थडे सेलिब्रेशन सुरू केले होते. अभिनेत्याने गुरूवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकारांसोबत सेलिब्रेशन केले.
पत्रकारांशी गप्पा मारल्यानंतर आमिरने सर्वांना त्याच्या नव्या पार्टनरला भेटवले. तसेच त्यांच्या नात्याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला.
आमिर खानच्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्प्रेट आहे. ती अर्धी तमिलीयन आणि अर्धी आयरिश आहे. तिला ६ वर्षांचा मुलगा आहे. तो तिला गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो आहे.
अभिनेत्याने सांगितले की, दोघांची भेट २५ वर्षांपूर्वी झाली होती आणि मग दोघांचा संपर्क तुटला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी ते दोघे परत कॉन्टॅक्टमध्ये आले.
आमिर खान आणि गौरी स्प्रेट गेल्या १८ महिन्यांपासून एकत्र आहेत. त्याने मस्करीत म्हटलं की, पाहा, मी तुम्हाला या गोष्टीचा पत्ता लागू दिला नाही ना. लग्नाबद्दल विचारले आमिर खान म्हणाला की, सध्या लग्नाचा विचार नाही. आम्ही एकत्र आनंदी आहोत. लग्नाचं नंतर बघू.
गौरीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. ती आमिरच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटली आहे आणि ते या नात्यामुळे खूश आहेत.
पत्रकारांशी बोलताना गौरी म्हणाली की, आमिरला मी सुपरस्टार मानत नाही. बॉलिवूडमध्ये कंफर्टेबल होत आहे. सलमान आणि शाहरुखला काल भेटले.
आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा जुनैद खान आणि मुलगी आयरा खान आहे. आमिर खान आणि रीना दत्ता यांचा२००२ मध्ये घटस्फोट झाला.
आमिर खानने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केले. या दोघांना एक मुलगा आहे. आमिर आणि किरणचा २०२१ साली घटस्फोट झाला. सध्या आमिर खान तिसऱ्यांदा रिलेशनशीपमध्ये आहे. आता तो गौरीशी लग्न करतो की नाही हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.