घन ओथंबून येती, आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रमली पावसाच्या आठवणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:16 PM2021-06-08T15:16:38+5:302021-06-08T15:30:33+5:30

पाऊस हा सर्वांचाच आवडता ऋतू. सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा हा किमयागार प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसलेचा देखील पावसाळा हा आवडीचा ऋतू.

पावसात भिजण्याची एकही संधी रुपाली सोडत नाही.

दरवर्षी मित्रमंडळींसोबत बँड स्टॅण्डला जाऊन पावसात मनसोक्त भिजणं.

मक्याचं कणीस आणि आईस्क्रीम खाणं हा तिचा ठरलेला नेम.

सध्या लॉकडाऊनमुळे हे शक्य नाही.

पण मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासा इथे सुरु असल्यामुळे सेटवरच तिने भिजण्याचा आनंद लुटला.

पावसाच्या आठवणींविषयी सांगताना रुपाली म्हणाली, ‘मी विरारला रहाते.

माझ्या बाल्कनीत तर मी छोटीशी बागच तयार केलीय.

पावसाळ्यात तर इथले वातावरण मन प्रसन्न करुन टाकणारा असते.

याच दरम्यान मोगऱ्याला बहर येतो. घरभर पसरणारा मोगऱ्याचा सुवास मन मोहित करुन टाकतो.

यंदा तर माझ्या आईने काकडीची वेलही लावली आहे. त्यामुळे घरगुती काकडीचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे.

विरारला रहात असल्यामुळे डोंगर, हिरवळ हे खूप जवळून अनुभवता येतं.

पावसामुळे वातावरणात आलेला गारवा, डोंगराच्या कुशीतून मनसोक्त उधळणारे धबधबे हे मला खूप आवडतं. त्यामुळे पाऊस माझ्या खूप जवळचा आहे.