आमिर खानची लेक इरा खान सोशल मीडियावर घालतेय धुमाकुळ, शेअर केले एक से बढकर एक फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 04:56 PM 2020-11-02T16:56:39+5:30 2020-11-02T17:11:57+5:30
आमिर खानची मुलगी इरा खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी इरा खानने खुलासा केला होता की ती गेली 4 वर्षे नैराश्यात होती सांगताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. जरी इरा खान अद्याप चित्रपटाच्या पडद्यापासून दूर असली तरीही स्टाईलमध्ये एखाद्या चित्रपट अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. हे बॉलिवूडमधील अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत इरा टक्कर देते.
इरा खान सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असते आणि ती अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.
नेहमीच चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
प्रत्येक अंदाज रसिकांच्या पसंतीस उतरतो. इराच्या या फोटोतील अंदाजही तिच्या फॅन्सना चांगलाच भावतो आहे.
रिअल लाइफमध्येही इरा तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.
स्टाइल आणि फॅशनची कायमच चर्चा होत असते. विविध फंक्शनला अनुसरुन आणि त्याला साजेशीच अशी इराची स्टाईल असते.
रुपेरी पडद्यावर तिचं दर्शन घडलं नसलं तरी आपल्या या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे.
लॉकडाऊन दरम्यान इराने बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लक्ष वेधून घेतले होते.
तिने अभिनयात नाही तर दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केलाय.