पळून जाऊन लग्न अन् २ वेळा घटस्फोट! लग्नानंतरही आमिर खानचे होते Extra Marital अफेअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:08 IST2025-03-16T14:46:50+5:302025-03-16T15:08:05+5:30
गौरी स्प्रॅटला डेट करत असल्याचं आमिरने सांगितलं. त्यानंतर आमिरच्या लव्ह लाइफ आणि अफेअर्सबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

आमिर खान पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आला आहे. ६०व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला.
गौरी स्प्रॅटला डेट करत असल्याचं आमिरने सांगितलं. त्यानंतर आमिरच्या लव्ह लाइफ आणि अफेअर्सबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.
दोन वेळा घटस्फोट घेतल्यानंतर आता आमिर पुन्हा प्रेमात पडला आहे. आमिरने १९८६ साली रिना दत्ताशी लग्न केलं होतं.
पण, लग्नानंतर जवळपास १६ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना जुनेद आणि इरा ही दोन मुले आहेत.
रीनाशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केलं. तिच्यासोबतही १६ वर्षांचा संसार केला.
किरण राव आणि आमिरला आझाद हा मुलगा आहे. २०२१ मध्ये किरण राव आणि आमिरच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना धक्का बसला होता.
बॉलिवूड करिअरमध्ये आमिरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. एवढंच नव्हे तर लग्नानंतरही त्याचे एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं बोललं गेलं होतं.
रीना दत्ताशी लग्न केल्यानंतर आमिर पूजा भटच्या प्रेमात पडला होता. त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र याबाबत दोघांनीही कधी वाच्यता केली नाही.
आमिर खान ब्रिटिश पत्रकार जेसिकाच्या प्रेमात पडला होता. 'गुलाम'च्या सेटवर त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. ते लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्या चर्चा होत्या. आमिरपासून मुलगा असल्याचंही जेसिका म्हणाली होती.
लग्नानंतर आमिर आणि ममता कुलकर्णीचंही अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण, याबाबत त्यांनी कधीच भाष्य केलं नाही.
रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर आमिर खान प्रीती झिंटाच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा होत्या. ते दोघं लग्न करणार असल्याचंही बोललं गेलं होतं.
आमिरचं नाव 'लगान' फेम अभिनेत्री रेचल शैलीसोबतही जोडलं गेलं होतं. मात्र त्यांचं नात फार काळ टिकलं नाही.
'दंगल'मधील अभिनेत्री फातिमा सना शेखसोबतही आमिरच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. फातिमा आमिरपेक्षा २६ वर्षांनी लहान आहे. मात्र याबाबत दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.