PHOTOS : बाबो, बाप लेकापेक्षाही तरूण झाला...! आमिर खानचे गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्स थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 03:04 PM2021-03-11T15:04:20+5:302021-03-11T15:20:51+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळेचर्चेत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या ‘हरफनमौला’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. याशिवाय आमिर त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आहे. अगदी मुलांपेक्षाही तो तरूण दिसतोय. अर्थात हे आम्ही नाही तर चाहत्यांचे मत आहे.

आमिर, त्याची मुलगी इरा आणि मुलगा जुनैद अलीकडे मुंबईत एकत्र दिसले. यादरम्यानचे तिघांचे फोटो तूूर्तास सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोमधील आमिरला पाहून चाहते अगदी हैराण आहेत. आमिरचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून प्रत्येकजण त्याचे कौतुक करतंय.

फोटोत आमिर निळ्या रंगाची टी-शर्ट व ग्रे कलरच्या पँटमध्ये दिसतोय. पण खास बात म्हणजे, बाप मुलांपेक्षाही छोटा दिसतोय, अशा आशयाच्या कमेंट्स त्याचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी केले आहेत.

आमिचा मुलगाच त्याच्यापेक्षा मोठा वाटतोय, असेही एका चाहत्याने लिहिले आहे. काहींनी तर जुनैदचा आमिरचा मुलगा आहे की आमिर जुनैदचा? अशी मजेदार कमेंट केली आहे.

‘हरफनमौला’ या गाण्यातही आमिरने अगदी नव्या दमाच्या तरूण हिरोला लाजवेल, असा परफॉर्मन्स दिला आहे.

या गाण्यातील त्याचे लूक, त्याचा डान्स पाहून तो 55 वर्षांचा आहे, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.

‘हरफनमौला’ या गाण्यासाठी आमिरने स्वत: स्वत:चा लूक डिझाईन केला आहे. हे गाणे ‘कोई जाने ना’ या सिनेमात घेतले जाणार आहे. आमिरचा मित्र अमिन हाजी हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

आमिरच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचे तर त्याचा ‘लालसिंग चड्ढा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात त्याच्यासोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.