पहिला चित्रपट ठरला सुपर डुपर हिट, एका दिवसात केले ४७ सिनेमे साईन, तरीही बुडालं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:03 IST2025-02-09T15:41:57+5:302025-02-09T16:03:59+5:30

९०च्या दशकातील एक अभिनेता प्रचंड गाजला होता. स्टारडममध्ये शाहरुख-सलमानला टक्कर देणाऱ्या अभिनेत्यानं १ दिवसांत ४७ सिनेमे साइन केले होते.

पहिल्याचं चित्रपटानं अभिनेत्याला रातोरात स्टार बनवलं होतं. तो अभिनेता होता राहुल रॉय (Rahul Roy) आणि त्याचा पहिला चित्रपट होता 'आशिकी'.

'आशिकी' सिनेमातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर असतात. राहुल रॉयनं 'आशिकी' सिनेमातून पदापर्ण केलं आणि त्याचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला.

या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवलं. सगळीकडे फक्त आणि फक्त राहुल रॉयचा बोलबाला होता. प्रत्येक चित्रपट निर्मात्याला राहुल रॉयसोबत काम करायचं होतं.

त्याला साईन करण्यासाठी घरासमोर निर्मात्यांची रांग लागायची. राहुल रॉयने अवघ्या ११ दिवसांत ४७ चित्रपट साईन करण्याचा विक्रम केला होता.

पण, राहुल रॉयकडून मोठी चूक घडली. ती म्हणजे राहुलने यश चोपडा यांचा 'डर' चित्रपट नाकारला. राहुलने नकार दिल्यावर शाहरुखने 'डर' चित्रपट केला आणि याच सिनेमानं त्याला स्टारडम मिळवून दिलं.

अभिनेत्याने श्रीदेवीसोबत १ चित्रपट, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि करिश्मा कपूरसोबत प्रत्येकी २ चित्रपट, पूजा भटसोबत ३ चित्रपट केले आणि ते सर्व बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.

राहुल रॉयची नशीबाने साथ सोडली. राहुलने 'जानम', 'फिर तेरी याद आयी', 'गुमराह', 'सपने साजन के' आणि 'मझदार' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण सर्व चित्रपट काही खास कामगिरी करू शकले नाहीत.

सलग सिनेमे फ्लॉप होत असल्यानं अभिनेत्यानं काही वर्षांसाठी ब्रेक घेतला. यानंतर तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनमध्ये आला आणि त्याचा विजेता बनून सर्वांना आश्चर्यचकित केलं.

पण तरीही त्याचा कारकिर्दीत त्याला काही फायदा झाला नाही. अखेर चित्रपटांपासून दूर जात त्यानं कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.