अभिजीत-सुखदाचा नव्या घरात गृहप्रवेश; पाहा अभिनेत्याच्या घराचे Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 07:00 IST2022-06-02T07:00:00+5:302022-06-02T07:00:06+5:30
Abhijeet khandkekar:पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने या जोडीचा नव्या घरात गृहप्रवेश झाला. यावेळी कलाविश्वातील काही मोजकी मंडळी व घरचे उपस्थित होते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून अभिजीत घराघरात पोहोचला.
सध्या अभिजीत तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
कलाविश्वात सक्रीय असलेल्या अभिजीतने अलिकडेच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या घराचे काही फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली होती.
अभिजीतच्या नव्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बुलेटवाले गुरुजी यांनी अभिजीत-सुखदाच्या घराचे फोटो शेअर केले आहेत. याच गुरुजींनी अभिजीतच्या घराची वास्तुशांती केली.
पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने या जोडीचा नव्या घरात गृहप्रवेश झाला. यावेळी कलाविश्वातील काही मोजकी मंडळी व घरचे उपस्थित होते.
नव्या घरात प्रवेश केल्याचा आनंद अभिजीत आणि सुखदा यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
शास्त्रशुद्ध पद्धतीने ही पुजा करण्यात आली.
नव्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर सुखदाने या घरात छानसं फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहे.
नव्या घरासह सुखदाचे फोटोदेखील चर्चेत येत आहेत.
सुखदा अभिजीतप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केलं आहे.
सुखदा कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसत असून तिचा हा मराठमोळा लूकदेखील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.