रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 05:31 PM 2023-03-18T17:31:46+5:30 2023-03-18T18:01:43+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली.
स्वत; आदित्य ठाकरे यांनी फोटो शेअर करत ही माहिती दिली, तसेच पुन्हा एकदा रजनीकांत मातोश्रीवर आल्याने आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटले. आदित्य यांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, ठाकरेंचा कठीण काळ सुरू असताना रजनीकांत यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतल्याने अनेक अर्थ काढले जात आहेत.
राज्याच्या राजकारणात शिवसेनेसाठी हा कठिण काळ सुरू आहे. अनेक जवळचे दूर निघून गेले. पण, मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब हयात नसतानाही रजनीकांत यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली.
रजनीकांत यांनी यापूर्वी २०१० मध्ये मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळीही, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकारे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंसमवेतच फोटो माध्यमांत आला होता.
आज तब्बल १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रजनीकांत मातोश्रीवर आले, यावेळीही सत्काराच फोटो काढण्यात आला. मात्र, यावेळीच्या फोटोत बाळासाहेबांची उणीव जाणवली. त्यामुळे, त्यांचा २०२४ मधील फोटो पुन्हा नजरेसमोर आलाय.
२०१० मध्ये रजनीकांत यांचा 'रोबोट' म्हणजेच तामीळ भाषेतला 'एंद्रीयन' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली होती.
दरम्यान, बाळासाहेबांच्या निधनानंतरही रजनीकांतने शोक व्यक्त करत संदेश लिहिला होता. बाळासाहेब हे माझ्यासह अनेकांना पितृतुल्य होते, असे रजनीने आपल्या शोकसंदेशात म्हटले होते.