आलिया की रणबीर? कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती; जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 03:40 PM2022-04-08T15:40:29+5:302022-04-08T15:51:21+5:30

Ranbir kapoor and alia bhatt: आलिया आणि रणबीर दोघंही लोकप्रिय कलाकार आहेत. तसंच त्यांचे कुटुंबीयदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचं नेटवर्थ जास्त आहे ते पाहुयात.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

येत्या १४ ते १७ एप्रिल दरम्यान ही जोडी लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर आलिया आणि रणबीर यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यामध्येच आता दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण याची चर्चा रंगली आहे.

आलिया आणि रणबीर दोघंही लोकप्रिय कलाकार आहेत. तसंच त्यांचे कुटुंबीयदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचं नेटवर्थ जास्त आहे ते पाहुयात.

बॉलिवूडच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये आलियाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आतापर्यंत आलियाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

रणबीरदेखील लोकप्रिय अभिनेता असून तो असंख्य तरुणींच्या गळ्यातलं ताईत असल्याचं म्हटलं जातं. रणबीरने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, २०२१ पर्यंत आलियाकडे १६२ कोटी रुपये संपत्ती होती. आलिया प्रत्येक महिन्याला ६० लाखांची कमाई करते.

एका चित्रपटासाठी आलिया ८- १० कोटी रुपये मानधन घेते. तसंच जाहिराती, ब्रँड प्रमोशनमधूनही ती पैसे कमवते.

रणबीर कपूरची २०२१ पर्यंतची संपत्ती ३३० कोटी रुपये होती. तो एका चित्रपटासाठी ७-८ कोटी रुपये मानधन घेतो.

रणबीर चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड इंडोर्समेंटमधून जवळपास १ कोटी रुपयांची कमाई करतो.

रणबीर आणि आलियामध्ये रणबीर जास्त श्रीमंत आहे. तसंच त्याच्याकडे अनेक महागड्या लक्झरी कारचं कलेक्शनही आहे.