actor ronit roy married twice and has three children know about his interesting love story
Photos: दोन लग्न, पहिल्या पत्नीपासून २० वर्षांची लेक; रोनित रॉयची इंटरेस्टिंग स्टोरी! By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:32 AM2023-10-11T11:32:04+5:302023-10-11T11:42:09+5:30Join usJoin usNext मिस्टर बजाजची रिअल लाईफ स्टोरी! 'कसौटी जिंदगी की' मालिकेतून 'मिस्टर बजाज' नावाने घराघरात पोहोचलेला अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy) आज 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्क्रीनवर फॅमिली मॅन ची भूमिका साकारणारा रोनित रॉय खऱ्या आयुष्यातही परफेक्ट पती, मुलगा आणि बाप आहे. रोनित रॉयचं वैयक्तिक आयुष्य खूपच इंटरेस्टिंग आहे. त्याची दोन लग्न झाली असून पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगीही आहे. तर दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ११ ऑक्टोबर १९६५ रोजी रोनित रॉयचा नागपूर येथे जन्म झाला. त्याचे वडील बिझनेसमन होते. रोनितनेही नंतर वडिलांचा बिझनेस सांभाळला. त्यांची सिक्योरिटी प्रोवाईड कंपनी आहे. ही कंपनी सेलिब्रिटींना व्हीआयपी सुरक्षा देते. ५८ वर्षांच्या रोनित रॉयचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. जोआना हिच्यासोबत त्याने लग्न होतं. त्यांना ओना ही मुलगीही आहे. लग्नानंतर काही वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांची मुलगी केवळ ६ महिन्यांची होती. घटस्फोटानंतर जोआना युएसला शिफ्ट झाली. त्यांची मुलगीही आईसोबत तिकडेच गेली. आज त्यांची लेक ओना २० वर्षांची असून रोनित आणि तिची भेट होत असते. पहिल्या पत्नीपासून वेगळं झाल्यानंतर रोनित रॉय एकटा पडला होता. तेव्हा त्याची भेट अभिनेत्री नीलम सिंहशी झाली. दोघांनी ३ वर्ष एकमेकांना डेट केलं. नीलमने 'सिलसिला है प्यार का', 'सुराग' सारख्या मालिकेत काम केलं आहे. अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतर रोनित आणि नीलम लग्नबंधनात अडकले. २५ डिसेंबर २००३ साली त्यांचं लग्न झालं. त्यांच्या लग्नात करिश्मा तन्ना, अपूर्व अग्निहोत्री, सोनू निगम सह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मढ आयलैंडच्या 'द रिसॉर्ट' हॉटेलमध्ये त्यांचं ग्रँड वेडिंग पार पडलं. मोठ्या भावाच्या लग्नात रोहित रॉयने स्वत: सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं होतं. रोनितने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याच्या दोन्ही पत्नींमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जेव्हा त्याची लेक ओना ग्रॅज्युएट झाली तेव्हा रोनित सोबत त्याची दुसरी पत्नी नीलमही युएसला आली होती. इतकंच नाही तर त्याच्या पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नात ते दोघंही सहभागी झाले होते. रोनित रॉय आणि नीलमला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं नाव अडोर तर मुलाचं नाव अगस्त्य आहे. रोनित एकूण तीन मुलांचा पिता आहे.टॅग्स :रोनित रॉयदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टलग्नRonit RoyLove Storymarriage