अभिनेत्री अदा खानचे फोटो काळजालाच भिडतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:09 IST2024-04-10T15:53:27+5:302024-04-10T16:09:17+5:30

अदा खान ही भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
नागीन, बेहेनें, विष या अमृत का सीतारा अशा अनेक मालिकांमध्ये तिने आजवर काम केले आहे.
मालिकांमध्ये ती काम करतेच. त्याचसोबत ती मॉडेल म्हणून देखील काम करते.
अदा खान तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे ओळखली जाते. अदाचा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.
अदा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अदा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.
नुकताच अदाने तिचे नवे फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये अदाचा लूक जबरदस्त दिसतोय.
सुंदर अशा पोज अदाने दिल्या आहेत. अदाचे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना आवडत आहे.
हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
येत्या काळात ती काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकणार आहे.