'गजनी' सिनेमात दिसलेली असीन इंडस्ट्रीतून गायब! लग्नानंतर घेतला 'हा' मोठा निर्णय
By देवेंद्र जाधव | Updated: April 2, 2025 17:55 IST2025-04-02T16:27:54+5:302025-04-02T17:55:47+5:30
गजनी सिनेमातून सर्वांचं मन जिंकणारी अभिनेत्री असीन सध्या काय करते? सिनेमात अभिनय का करत नाही? जाणून घ्या

२००८ साली आलेला 'गजनी' सिनेमा चांगलाच गाजला. आमिर खान आणि अभिनेत्री असीनची जोडी चांगलीच गाजली.
आमिर खानने सिनेमात संजय सिंघानियाची जोडी साकारली होती तर असीन आपल्याला कल्पनाच्या भूमिकेत दिसली. इतकी वर्ष झाली तरीही या सिनेमाची क्रेझ कायम आहे
'गजनी' सिनेमात झळकलेली असीन सध्या मात्र इंडस्ट्रीतून चांगलीच गायब आहे. ती मूळची साऊथची असली तरीही बॉलिवूड किंवा साऊथ इंडस्ट्रीतील कोणत्याही सिनेमात ती दिसत नाही. काय आहे यामागचं कारण
असीनने २०१६ साली मायक्रोमॅक्स कंपनीचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्याशी लग्न केलं. असीन आणि राहुलच्या लग्नाची खूप चर्चा झाली.
असीन आणि राहुलला अरीन ही मुलगी आहे. असीन सोशल मीडियावर पती राहुल आणि लेकीचे फोटो पोस्ट करत असते.
असीनच्या लग्नाला बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने हजेरी लावली होती. असीनने लग्नानंतर कुटुंब सांभाळण्याची आणि मुलीला वाढवण्याची जबाबदारी स्वाकीरली.
त्यामुळे लग्नानंतर असीनने कोणत्याही सिनेमात काम केलं नाही. असीनचे चाहते तिच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत. परंतु असीन आता पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक करेल, याची शक्यता कमी आहे.